तुळस वारंवार सुकते? या टिप्स आजमावून पाहा पुन्हा बहरेल रोप

तुळशीचे रोप हे आरोग्यदायी असते. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भारतीयांच्या घरासमोर तुळस असतेच. पण कधी-कधी कितीही वेळा तुळस लावली तरी ती सुकून जाते. 

| Feb 12, 2024, 18:31 PM IST

Gardening Tips For Green Tulsi: तुळशीचे रोप हे आरोग्यदायी असते. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक भारतीयांच्या घरासमोर तुळस असतेच. पण कधी-कधी कितीही वेळा तुळस लावली तरी ती सुकून जाते. 

1/8

तुळस वारंवार सुकते? या टिप्स आजमावून पाहा पुन्हा बहरेल रोप

Gardening Tips For Green Tulsi 3 Ways to Grow Tulsi

 तुळशीचे रोप घरासमोर लावणे हे शुभ समजले जाते. तुळस घरात लावल्याने सुख-समृद्धी नांदते. घरात तुळस लावल्याने हवा शुद्ध होते. पण कितीही पाणी घातले तरी तुळस सुकत असल्याच्या समस्यांना अनेकांना तोंड द्यावे लागते. 

2/8

हे उपाय करा

Gardening Tips For Green Tulsi 3 Ways to Grow Tulsi

तुळशीचे रोप वारंवार सुकणे वास्तु आणि धर्मानुसार योग्य नाहीये. धार्मिक दृष्ट्या तुळस सुकणे अशुभ मानले जाते. जर, तुमच्या घरातील तुळसही सुकत असेल तर हे उपाय करुन पाहा. 

3/8

पाने

Gardening Tips For Green Tulsi 3 Ways to Grow Tulsi

तुळशीच्या पानांना कधीकधी किड लागते. अशावेळी ही पाने सुकत जातात. त्यामुळं सतत खराब झालेली पाने काढत जा व कडुलिंबाच्या तेल स्प्रे करत राहा. 

4/8

मंजिरी

Gardening Tips For Green Tulsi 3 Ways to Grow Tulsi

तुळशीच्या रोपाला मंजिरी लागल्या तर त्या काढत जा. यामुळं रोप सुकू शकते. सुकलेल्या मंजिरी तुम्ही पदार्थांमध्ये फ्लेवर म्हणून वापरु शकता. त्याचबरोबर औषधांसाठीही वापरु शकता. 

5/8

खत

Gardening Tips For Green Tulsi 3 Ways to Grow Tulsi

तुळशीचे रोप लावण्यासाठी 70 टक्के माती आणि 30 टक्के रेती टाका. या पद्धतीने तुळशीचे रोप लावल्यास अधिक वेळ मुळांपर्यंत पाणी राहते. त्यामुळं तुळसही सतत सुकत नाही. 

6/8

सतत पाणी घालू नका

Gardening Tips For Green Tulsi 3 Ways to Grow Tulsi

तुळशीच्या रोपांना पाणी देणे शुभ मानले जाते. अशावेळी अनेकदा तुळशीच्या रोपांना सतत पाणी घातले जाते. यामुळं माती खूप ओली होऊ शकते आणि रोप सुकू शकते. तुळशीच्या रोपांना अतिप्रमाणात पाणी घालू नका. 

7/8

हिवाळ्या दिवसांत लक्ष द्या

Gardening Tips For Green Tulsi 3 Ways to Grow Tulsi

तुळशीचे रोप धार्मिक आणि औषधी गुणांनी युक्त असते. यामुळं प्रत्येक भारतीयांच्या घरात लावले जाते. हिवाळ्याच्या दिवसांत तुळशीचे रोप सुकत जाते. त्यामुळं या टिप्स लक्षात ठेवा. 

8/8

Disclaimer:

Gardening Tips For Green Tulsi 3 Ways to Grow Tulsi

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)