तुमच्या बाप्पाची आरास बघा झी 24 तासवर

गणपती आले की सगळीकडेच आनंदाचे वातावरण असते. गणेशभक्त मोठ्या उत्साहात गणपतीची आरास करतात. घरातला गणपती असो किंवा मंडळाचा भक्तीभावाने बाप्पाची पूजा अर्चना केली जाते. 

Sep 09, 2024, 08:53 AM IST
1/8

1. रिद्धी चेंबूरकर, पेन, रायगड

पेनमध्ये राहणाऱ्या रिद्धी चेंबूरकर यांच्या घरी गणपतीची आरास म्हणून चेंबूरकर चाळ साकारण्यात आली आहे. 

2/8

2. अशोक उपाळे, कळमगाव, महाबळेश्वर

अशोक उपाळेयांनी पर्वत, चंद्र साकारत गणपती बाप्पासाठी देखावा तयार केला आहे.

3/8

3. तेजस खोमणे, कटेमानिवली, कल्याण

तेजस खोमणे यांच्या घरी विविधरंगी सजावट करण्यात आली असून त्यात खोमणेंचा राजा विराजमान झाला आहे.

4/8

4. विजय आकुर्डेकर, बिबवेवाडी

बिबवेवाडीतील वृंदावन सोसायटीमध्ये राहणारे श्री संजय आकुर्डेकर यांनी कागदी पुठ्ठ्यांचा वापर करून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे. 

5/8

5. गोरख नवघणे, पिंपरी चिंचवड़ शहर

गोरख नवघणे यांनी गणपतीच्या देखावा म्हणून विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. यात बाप्पा शोभून दिसत आहे.

6/8

6. केदार शंकर पित्रे, कोथरुड, पुणे

पुण्याच्या पित्रे कुटुंबियांनी आपल्या घरी गणपती उत्सवासाठी खास पर्यावरणपूरक सजावट केली आहे. यामध्ये पत्रावळ्या आणि द्रोण यांचा वापर केला आहे.

7/8

7. स्नेहल पाटोळे, थेरगाव चिंचवड, पुणे

पुण्यातील स्नेहल यांनी झोपाळ्यावर बसलेला बाप्पा आणि जुने वर्तमानपत्र, काठ्यांपासून बनवलेले झाड अशी पर्यावरणपूरक आरास केली आहे.

8/8

8. सुजीत येवलेकर, पनवेल

येवलेकर कुटुंबियांनी शिवालयचा देखावा साकारला आहे. महत्त्वाचे म्हणजे कागद आणि पुठ्ठे यापासून देखावा साकारण्यात आला आहे. झाड, शंकराची पिंड, गोमुखातून अखंड वाहणारे पाणी अशा सुंदर वातावरणात बाप्पा स्थानपन्न झाले आहेत.