Ganesh Chaturthi 2023 : मुंबईत हा बाप्पा 69 किलो सोनं, 336 किलो चांदीने सजला, 'इतक्या' कोटींचे विमा कवच

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा सण थाटामाटात साजरा करण्यात येतोय. मुंबईदेखील बाप्पामय झाला आहे. मुंबईत अनेक नावाजलेले आणि प्रसिद्ध असं गणेश मंडळ आहे. त्यातील मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून या बाप्पाला ओळखलं जातं. 

Sep 19, 2023, 13:02 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : मुंबईत गणेशोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचला आहे. सर्वत्र वातावरण बाप्पामय झालं आहे. मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून माटुंग्या वडाळातील GSB सेवा मंडळ म्हणून ओळखलं जातं. 
 

1/7

यंदा या मंडळाचं 69 वा वर्ष असून मोठ्या उत्साहात दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. या बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दरवर्षी येत असतात.   

2/7

दरवर्षीच या विश्वाचा राजा गणपतीला सोन्याची मोठी भर पडत असते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील अधिकच्या सोन्याचं दान या बाप्पाच्या चरणी मिळालं आहे. 

3/7

यावर्षी बाप्पाच्या मूर्तीला 69 किलो सोनं, 336 किलो चांदीने सजवण्यात आलं आहे. 

4/7

यावर्षी नव्याने 36 किलो चांदीच्या प्रसादाच्या भांड्यांची भेट बाप्पा चरणी अर्पण करण्यात आलं आहे.

5/7

यावर्षी या गणेशोत्सव मंडळाकडून एकूण 360 कोटी रुपयांचा विमादेखील काढण्यात आला आहे.

6/7

 गणरायाच्या मूर्तीच्या सुरक्षेसाठी फेशियल रेकग्निशन बसवण्यात आलं आहे.

7/7

त्याशिवाय संपूर्ण मंडळात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.