Ganesh Chaturthi 2023: 'या' दिवशी घरोघरी येणार बाप्पा, जाणून घ्या गणेश चतुर्थीची नेमकी तारीख आणि महत्त्व

 गणपती बाप्पाला समृद्धी आणि बुद्धीची देवता मानले जाते. अशाप्रकारे गौरीपुत्र गणेशाची विधिवत पूजा केल्याने घरात सर्व काही शुभ होते. यासोबतच शुभ कार्यात येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. 

| Aug 12, 2023, 18:00 PM IST

Ganesh Chaturthi 2023: गणपती बाप्पाला समृद्धी आणि बुद्धीची देवता मानले जाते. अशाप्रकारे गौरीपुत्र गणेशाची विधिवत पूजा केल्याने घरात सर्व काही शुभ होते. यासोबतच शुभ कार्यात येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. 

1/9

Ganesh Chaturthi 2023: 'या' दिवशी घरोघरी येणार बाप्पा, जाणून घ्या गणेश चतुर्थीची नेमकी तारीख आणि महत्त्व

Ganesh Chaturthi 2023 Bappa will come to every house from this day know the exact date and significance

Ganesh Chaturthi 2023 Date: वर्षभर भक्त गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट पाहत असतात. यासाठी भाविक एक महिना अगोदरपासूनच तयारीला लागतात. बाप्पाच्या स्वागतासाठी घर, मंदिर, सार्वजनिक मंडपात विशेष सजावट केली जाते. 

2/9

गणेश चतुर्थीचा सण

Ganesh Chaturthi 2023 Bappa will come to every house from this day know the exact date and significance

देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात गणेश उत्सवाचे विशेष महत्व आहे.

3/9

आराधनेत तल्लीन

Ganesh Chaturthi 2023 Bappa will come to every house from this day know the exact date and significance

संपूर्ण 10 दिवस मुंबईकर गणपतीच्या आराधनेत तल्लीन दिसतात. 2023 मध्ये गौरीचा मुलगा गणेशचे स्वागत कोणत्या दिवसापासून होणार, जाणून घेऊया.

4/9

गणेश चतुर्थीला सुरुवात

Ganesh Chaturthi 2023 Bappa will come to every house from this day know the exact date and significance

हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. तर 28 सप्टेंबर 2023 रोजी गणपती विसर्जन होणार आहे.

5/9

भाद्रपद मासी जन्म

Ganesh Chaturthi 2023 Bappa will come to every house from this day know the exact date and significance

धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला. गणेश उत्सवादरम्यान भाविक बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात आणि संपूर्ण 10 दिवस विधीपूर्वक गणपतीची पूजा करतात.  

6/9

गणेश चतुर्थीचे महत्व

Ganesh Chaturthi 2023 Bappa will come to every house from this day know the exact date and significance

गणपती बाप्पाला समृद्धी आणि बुद्धीची देवता मानले जाते. अशाप्रकारे गौरीपुत्र गणेशाची विधिवत पूजा केल्याने घरात सर्व काही शुभ होते. यासोबतच शुभ कार्यात येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. 

7/9

सुख-समृद्धी

Ganesh Chaturthi 2023 Bappa will come to every house from this day know the exact date and significance

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्ताला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही, असे मानले जाते. यासोबतच घर सुख-समृद्धी आणि धन-धान्याने भरलेले असते. 

8/9

आधी गणेशाची पूजा

Ganesh Chaturthi 2023 Bappa will come to every house from this day know the exact date and significance

शास्त्रानुसार कोणत्याही देवतेची पूजा करण्याआधी गणेशाची पूजा करण्याची प्रथा आहे. सर्वप्रथम गणपतीची आरती केली जाते. विघ्नहर्ता गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

9/9

माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित

Ganesh Chaturthi 2023 Bappa will come to every house from this day know the exact date and significance

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)