PHOTO : टेलिव्हिजन ते रुपेरी पडदा... दिग्दर्शकाशी गुपचूप लग्नगाठ बांधणाऱ्या 'या' अभिनेत्रीनं घेतलेला बॉलिवूड सोडण्याचा निर्णय?

Yami Gautam Birthday : टेलिव्हिजन मालिकेतून पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. बॉलिवूड गाजवणारी या अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकाशी गुपचूप लग्न केलं. बॉलिवडूमध्ये दम बसल्यानंतरही ही अभिनेत्री सिनेसृष्टीला रामराम ठोकणार होती.

Nov 28, 2023, 10:00 AM IST
1/8

फोटोमधील ही चिमुकली वयाच्या 20 व्या वर्षी मुंबईत आली आणि टीव्ही मालिकेतून अभिनेत्री करिअरला सुरुवात केली. 2008 मधील चांद के पार चलो या पहिल्या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर ये प्यार ना होगा कम या मालिकेतून तिची दखल चित्रपटसृष्टी घेतली. 

2/8

हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिने साऊथमधील काही चित्रपट केले. बॉलिवूडमधील तिचा पहिला चित्रपट 2012 मधील विकी डोनरमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. 

3/8

आम्ही कोणाबद्दल बोलतोय, तुम्हाला कळलंच असेल. यामी गौतमी...हो आज हिचा वाढदिवस आहे. 

4/8

ए थर्सडे, उरी, गिन्नी वेड्स सन्नी, बाला, काबिल, सरकार 3, बत्ती गुल मीटर चालू, भूत पोलीस आणि नुकताच ओएमजी 2 या चित्रपटांमधील अभिनयाने तिने बॉलिवूड गाजवलं. पण ही अभिनेत्री बॉलिवूडला रामराम करणार होती. 

5/8

यशस्वी करिअर असूनही बाला चित्रपटापूर्वीच तिने इंडस्ट्रीला अलविदा करण्याचं ठरवलं होतं. कारण चांगले चित्रपट करूनही तिला हवी ती ओळख आणि प्रसिद्धी मिळाली नाही. म्हणून ती बॉलिवूड सोडणार होती. पण घरच्यांशी बोल्यानंतर तिने प्लॅन बदला.   

6/8

करिअरसोबतच तिची लव्ह लाइफ खूपच रंजक आहे. 2019 मधील 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाच्या वेळी यामी आणि आदित्य धर यांची भेट झाली. खरं तर त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर त्यांचं प्रेम प्रकरण सगळ्यांसमोर आलं. 

7/8

या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम आणि नंतर लग्नापर्यंत पोहोचलो असं यामीने एका मुलाखतीत सांगितले.   

8/8

लग्नातील साधेपणा, आईची 33 वर्षांपूर्वीची जुनी सिल्क साडी, 18 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळाचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चाहत्यांनी तिचं खूप कौतुक केलं होतं.