अयोध्येत सोन्याचे दरवाजे देणार सुवर्णक्षणांची साक्ष; प्रभू श्रीराम चांदीच्या सिंहासनावर होणार विराजमान

अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मंदिराचं बांधकाम वेगाने सुरु असून आतील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.   

Jan 11, 2024, 13:12 PM IST

अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मंदिराचं बांधकाम वेगाने सुरु असून आतील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

1/7

अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मंदिराचं बांधकाम वेगाने सुरु असून आतील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.   

2/7

दरम्यान राम मंदिरात सोन्याचे दरवाजे लावले जात असून हे भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत.   

3/7

यातील एक दरवाजा रामलल्लाच्या गर्भगृहाचा मुख्य दरवाजा आहे.   

4/7

सोन्याचे एकूण 13 दरवाजे लावले जाणार असून, आतापर्यंत 4 दरवाजे लावण्यात आले आहेत.   

5/7

दरवाजासाठी हजार किलो सोन्याचा मुलामा वापरण्यात आला असल्याची माहिती आहे. हे दरवाजे सोन्याच्या अक्षरांनी सजवलेले आहेत.  

6/7

मंदिरात नक्षीदार, कोरीव काम केलेले दरवाजे लावण्यात आले आहेत. दरवाजावर विष्णूचे कमळ, भव्यतेचे प्रतीक गज म्हणजेच हत्ती, अभिवादन मुद्रेतील देवी चित्रित करण्यात आली आहे. श्री राम मंदिराचे दरवाजे प्राचीन सागवान वृक्षांपासून बनवलेले आहेत.   

7/7

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलल्लाच्या मंदिरात 44 दरवाजे असतील, त्यापैकी 14 दरवाजे सोन्याने मढवलेले असतील. यासोबतच 30 दरवाजांवर चांदीचा लेप लावण्यात येणार असून प्रभू रामलल्ला यांच्या सिंहासनावरही चांदीचा लेप लावण्यात आला आहे. म्हणजेच प्रभू श्रीराम ज्या सिंहासनावर बसणार आहेत, त्या सिंहासनावर चांदीचा थर लावण्यात आला आहे.