रिस्पेक्ट! राज्यसभेत कर्तव्य पार पाडण्यासाठी पोहोचले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहून राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली (दुरुस्ती) विधेयक, 2023 वर चर्चा केली. माजी पंतप्रधान दीर्घकाळानंतर सभागृहात हजर झाले आहेत. मनमोहन सिंग हे बऱ्याच दिवसांपासून अस्वस्थ आहेत.

Aug 08, 2023, 08:16 AM IST

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहून राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली (दुरुस्ती) विधेयक, 2023 वर चर्चा केली. माजी पंतप्रधान दीर्घकाळानंतर सभागृहात हजर झाले आहेत. मनमोहन सिंग हे बऱ्याच दिवसांपासून अस्वस्थ आहेत.

 

1/7

दिल्ली सेवा विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजूरी

Delhi Services Bill passed in both Houses

दिल्ली सेवा विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. लोकसभेत मंजूर झाल्यानंतर हे विधेयक राज्यसभेत पोहोचले होते.

2/7

विधेयकाच्या बाजूने पडली 131 मते

rajyasabha

राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने 131 मते पडली, तर विरोधात 102 मते पडली. अशा प्रकारे दिल्ली सेवा विधेयक दोन्ही सभागृहात सहज मंजूर झाले. 

3/7

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ठरले चर्चेचा विषय

Former Prime Minister Manmohan Singh became the topic of discussion

त्याचवेळी, दिल्ली सेवा विधेयक मंजूर होत असताना, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे चित्र खूप चर्चेत आहे. माजी पंतप्रधान व्हीलचेअरवर बसून सभागृहात पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.

4/7

माजी पंतप्रधानांच्या जिद्दीला सलाम

Salute to the stubbornness of the former Prime Minister

वास्तविक, माजी पंतप्रधानांचे हे छायाचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे सभागृहात पोहोचल्याबद्दल लोक माजी पंतप्रधानांच्या जिद्दीला सलाम करत आहेत. 

5/7

म्हणून सभागृहाच्या आसनावर बसले नाहीत मनमोहन सिंग

manmohan sing at rajya sabha

वयाच्या 90 व्या वर्षी सभागृहात पोहोचणे हे कौतुकास्पद असल्याचे लोक म्हणतात. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये माजी पंतप्रधान सभागृहाच्या मागील बाजूस बसल्याचे असल्याचे दिसत आहे. या फोटोत माजी पंतप्रधानांच्या समोर पायऱ्या दिसत आहेत. त्यामुळेच व्हीलचेअर पुढे नेण्यात आली नाही.

6/7

गेल्या वर्षीही आले होते माजी पंतप्रधान

x pm sing

गेल्या वर्षी 18 जुलै रोजी माजी पंतप्रधान आणि काँग्रेस खासदार मनमोहन सिंग हेही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी आले होते. यादरम्यान सिंग यांना व्हीलचेअरवर बसवून तेथे आणण्यात आले.

7/7

काँग्रेसची जोरदार तयारी

PM Sing congress

आपल्या खासदारांना व्हीप जारी करण्यापासून ते अस्वस्थ नेत्यांसाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यापर्यंत, विधेयकावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्षाला खडतर आव्हान देण्यासाठी काँग्रेसने प्रत्येक पाऊल उचलले होते.