मुंबईतील 'या' ठिकाणी आहे विनोद कांबळीचं आलिशान घर, किंमत ऐकून घाम फुटेल, पाहा Photos

भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी आरोग्याशी संबंधित विविध समस्यांमुळे त्रस्त आहे. 21 डिसेंबर रोजी शनिवारी त्याची तब्येत खालवल्याने त्याला ठाण्यातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. विनोद कांबळीचे मुंबईत आलिशान घर आहे, तेव्हा त्याच्या घराचे इनसाईड फोटो पाहुयात. 

Pooja Pawar | Dec 24, 2024, 12:30 PM IST
1/7

माजी क्रिकेटर विनोद कांबळी याच मुंबईतील ज्वेल टॉवरमध्ये आलिशान घर आहे. फक्त कांबळीच नाही तर या बिल्डिंगमध्ये अजिंक्य रहाणे, अजित आगरकर इत्यादी मुंबईतील स्टार क्रिकेटर्सची घर आहेत. 

2/7

ज्वेल टॉवरमधील विनोद कांबळीचे हे घर जवळपास 1500 स्क्वेअर फूटचं असून हा 3 BHK फ्लॅट आहे. विनोद कांबळीने करिअरमध्ये यशस्वी होत असताना हे घर खरेदी केलं होतं. 

3/7

विनोद कांबळीने ज्वेल टॉवर मधील घर काही वर्षांपूर्वी 1.5  कोटींना विकत घेतलं होतं. सध्या या घराची किंमत जवळपास 8 कोटी इतकी आहे.   

4/7

विनोद कांबळीने कुटुंबासोबत घरातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमधून कांबळीचं घर किती आलिशान आहे याची जाणीव होते.   

5/7

विनोद कांबळीने मुंबईतील हे घर खरेदी करण्यासाठी डीएनएस बँककडून 50 लाखांचं लोन घेतलं होतं. मात्र आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने कांबळीने घराचे काही EMI थकवले. ज्यामुळे डीएनएस बँकेने त्याचे नाव डिफॉल्टर म्हणून वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले होते.  

6/7

वाईट फॉर्ममुळे टीम इंडियात संधी मिळत नसल्याने विनोद कांबळीने 22 सप्टेंबर 2011 रोजी आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो काहीकाळ क्रिकेट कोच म्हणून देखील काम करत होता. मात्र 2013  मध्ये त्याना दोनदा हार्ट अटॅक आला तसेच मद्यपान करण्याच्या सवयीमुळे त्याला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या. 

7/7

विनोद कांबळी 9 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला, दरम्यान त्याने 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळला ज्यात त्याने एकूण 3500 हून अधिक धावा केल्या. बीसीसीआयकडून विनोद कांबळी याला 30 हजार रुपये महिना पेन्शन मिळते.