तब्बल पाच महिन्यांनंतर काश्मीरमधील ऐतिहासिक मार्ग प्रवासासाठी खूला

वाहनांना पुंछ येथून श्रीनगरकडे जाण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. 

May 02, 2019, 20:35 PM IST

जम्मू-काश्मीरच्या दक्षिणेस स्थित असलेल्या शोपियाला जम्मू क्षेत्रातील राजौरी आणि पुंछ या ऐतिहासिक मार्गांना जोडणारा रस्ता गेल्या ५ महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला होता. पण बुधवारी हा रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. वाहनांना पुंछ येथून श्रीनगरकडे जाण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. 

1/4

तब्बल ८६ किलोमिटर लांबीचा हा रस्ता आहे.

८६ किलोमिटर लांबीचा हा मुघलकालीन रस्ता बुधवारी सकाळी ११ वाजता मोकळा करण्यात आला. त्यामूळे लोकांनी आनंद व्यक्त केला आणि सांगितले की रस्त्याच्या बंद होण्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला.  

2/4

ऐतिहासिक रस्त्याच्या नावाने प्रसिद्ध

काश्मीर महामार्गावरील पर्याय म्हणून वापरल्या जाणार्या या ऐतिहासिक रस्त्यावर अनेक ठिकाणी बर्फ जमा झाले होते. त्यामूळे हा रस्ता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला होता.  

3/4

तब्बल ५ महिने बंद होता मुघल रस्ता

जम्मू मार्गाचा आधार घेत प्रवाश्यांना काश्मीर गाठता येत होते. ज्यामध्ये त्यांना दोन दिवसांचा कालावधी लागत होता. 

4/4

हिमवर्षावाचे प्रमाण जास्त असल्यामूळे

काश्मीसह राजौरी आणि पुंछला जोडणार ऐतिहासिक मार्ग पाच महिने बंद करण्यात आला होता. हिमवर्षावाचे प्रमाण जास्त असल्यामूळे हा रस्ता बंद करण्यात आला होता.