1/6
पत्नी कॅन्सरशी झुंज देत होती आणि मी....- आयुषमान खुराना
#CoupleGoals म्हणजे नेमकं काय असतं असा प्रश्न पडल्यास गुगलकडे याची बहुरंगी आणि बहुढंगी उत्तरं आहेतच. पण, खऱ्या आयुष्यात याचं उदाहरण पाहायचं असेल तर, मात्र अशाही काही जोड्या आहेत ज्यांच्या नात्याने प्रेमापलीकडे जात खऱ्या अर्थाने एकमेकांची साथ देणं म्हणजे नेमकं काय असते याचं सुरेख असं उदाहरण देत एक पायंडाच पाडला आहे. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता आयुषमान खुराना आणि त्याची पत्नी, लेखिका ताहिरा कश्यपची. व्हिजे, आरजे, सूत्रसंचालक, लेखक, गायक आणि अभिनेता अशा विविध टप्प्यांवर पोहोचत आयुषमानने कलाविश्वात त्याची ओळख आणि त्याचा असा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. या साऱ्यामध्ये त्याला पावलोपावली साथ दिली ती म्हणजे त्याची पत्नी ताहिरा कश्यप हिने. ताहिरा आणि आयुषमानचं नातं हे नेमकं किती दृढ आहे, हे गेल्या काही दिवसांपासून अधिक स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- @tahirakashyap)
2/6
पत्नी कॅन्सरशी झुंज देत होती आणि मी....- आयुषमान खुराना
सारंकाही सुरळीत सुरू असतानाच ताहिराला कर्करोग असल्याचं निदान झालं. पण, या परिस्थितीतही आयुषमान आणि तिने आयुष्याकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनात तसूभरही बदल होऊ दिला नाही. एका मुलाखतीत त्याने नुकताच ताहिराची कर्करोगाशी असणाऱी झुंज नेमकी कशी होती याविषयीची माहिती दिली. ''हे सारंकाही फार कठीण होतं. मुळात मी तिचेच आभार मानू इच्छितो की इतक्या धाडसाने तिने प्रसंगाला तोंड दिलं, नाहीतर मी पूर्णपणे कोलमडून गेलो असतो. मी 'अंदाधुन' आणि 'बधाई हो' अशा दोन चित्रपटांच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असतेवेळीच तिच्या आजारपणाचं निदान झालं होतं. माझ्या वाढदिवसाच्याच दिवशी ही बाब आम्हाला कळली होती. किंबहुना त्याच दिवशी आम्ही 'मनमर्जियाँ' हा चित्रपटही पाहिला', असं आयुषमान म्हणाला. (छाया सौजन्य- @tahirakashyap)
3/6
पत्नी कॅन्सरशी झुंज देत होती आणि मी....- आयुषमान खुराना
ताहिरात्या धाडसी वृत्तीविषयी अधिक माहिती देत मोठ्या अभिमानाने आयुषमान म्हणाला, 'मला प्रत्येक क्षण साजरा करायचा आहे अशीच तिची भूमिका होती. आम्ही दोघंही यादरम्यान आजाराशी लढलो, चित्रपटाच्या प्रसिद्धीत सहभागी झालो होतो.' हे आपल्या दोघांचेही प्रयत्न होते, असं त्याने न विसरता सांगितलं. (छाया सौजन्य- @tahirakashyap)
4/6
पत्नी कॅन्सरशी झुंज देत होती आणि मी....- आयुषमान खुराना
5/6
पत्नी कॅन्सरशी झुंज देत होती आणि मी....- आयुषमान खुराना
6/6