भारतात बॅन केलेल्या चित्रपटाने पाकिस्तानात कमवले तब्बल 8300 कोटी, आता आपल्याकडे प्रदर्शित होणार!

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली होती. पण या चित्रपटाने जगभारत भरपूर कमाई केली. आता हा चित्रपट भारतातही प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

| Sep 05, 2024, 14:07 PM IST
1/6

फवाद खान

फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खान यांची जोडी 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' चित्रपटामध्ये दिसली होती. या दोघांशिवाय हमजा अब्बासी, हुमैमा मलिक, गौहर रशीद, शमून अब्बासी, अली अज़मत आणि अदनान जफर या कलाकारांनीही चित्रपटात आपल्या अभियन कौशल्यात भर घातली. 

2/6

100 कोटींचा आकडा

फवाद खान आणि माहिराच्या या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांमध्ये 100 कोटींचा आकडा पार केला होता. लोकांना चित्रपटाची कथा आणि त्यांची जोडी खूप आवडली होती. 

3/6

जगभरात 8300 कोटींची कमाई

मीडिया रिपोर्टनुसार, 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' हा चित्रपट फक्त 45 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि या चित्रपटाने जगभरात 8300 कोटी रुपयांची कमाई केली होती. 

4/6

भारतात प्रदर्शित होणार

फवाद खानच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा  'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' हा चित्रपट ठरला आहे. रिपोर्टनुसार, हा चित्रपट भारतात देखील प्रदर्शित होणार आहे. 

5/6

अधिकृत घोषणा नाही

 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' हा चित्रपट भारतात याच महिन्यात प्रदर्शित होऊ शकतो. E24 च्या रिपोर्टनुसार, झी स्टुडिओ 20 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये हा चित्रपट रिलीज करण्यासाठी योजना आखत आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

6/6

कपूर अँड सन्स

फवाद खानने केवळ पाकिस्तानी इंडस्ट्रीमध्येच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. 'कपूर अँड सन्स' या चित्रपटात देखील तो दिसला होता.