FASTag रिचार्ज करण्याच्या नादात गमावले 2.4 लाख रुपये; तुमच्याकडूनही होऊ शकते 'ही' चूक

FASTag Recharge Scam: तुम्ही सुद्धा फास्ट टॅग वापरता का? अनेकदा तुम्हीही फास्ट टॅग रिचार्ज केलं असेल. मात्र असाप्रकारे फास्ट टॅग रिचार्ज करणं एका मुंबईकराला फारच महागात पडलं आहे. त्याने जी चुकी केली ती तुमच्याकडूनही होऊ शकते. नेमकं घडलं काय पाहूयात...

| Jan 18, 2024, 11:54 AM IST
1/10

FASTag Recharge scam Man loses Rs 2 lakh 40000 after installing mobile app

एका मुंबईकराला FASTag रिचार्ज करणं फारच महागात पडलं आहे. FASTag रिचार्ज करताना या मुंबईकराच्या बँक खात्यावरुन 2.4 लाख रुपये गायब झाले.

2/10

FASTag Recharge scam Man loses Rs 2 lakh 40000 after installing mobile app

मुंबईतील नालासोपाऱ्यामध्ये राहणारी एक व्यक्ती सायबर चोरांच्या जाळ्यात अडकली. फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या खात्यावरुन 2.4 लाख रुपयांना गंडा घातला आहे.  

3/10

FASTag Recharge scam Man loses Rs 2 lakh 40000 after installing mobile app

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 17 जानेवारी रोजी 47 वर्षीय व्यक्तीला FASTag रिचार्ज करताना टेक्निकल अडचण आली.

4/10

FASTag Recharge scam Man loses Rs 2 lakh 40000 after installing mobile app

FASTag रिचार्जसंदर्भातील ही अडचण सोडवण्यासाठी या व्यक्तीने कस्टमर केअरला फोन केला. इथूनच फसवणुकीची सुरुवात झाली.

5/10

FASTag Recharge scam Man loses Rs 2 lakh 40000 after installing mobile app

या व्यक्तीने FASTag रिचार्जसाठी कस्टमर केअरला कॉल करण्याच्या उद्देशाने इंटरनेटवर नंबर सर्च केला. या व्यक्तीला गुगलवर सायबर चोरांचा क्रमांक हा कस्टमर केअरचा क्रमांक सर्च केल्यावर दिसतो याची कल्पना नव्हती.  

6/10

FASTag Recharge scam Man loses Rs 2 lakh 40000 after installing mobile app

या व्यक्तीने गुगलवर सापडलेल्या क्रमांकावर फोन केला तेव्हा समोरच्या व्यक्तीने FASTag रिचार्ज करण्यासाठी एक App डाऊलोड करण्यास सांगितलं. या व्यक्तीने App डाऊनलोड केलं.  

7/10

FASTag Recharge scam Man loses Rs 2 lakh 40000 after installing mobile app

या App च्या मदतीने सायबर चोराने समोरच्या व्यक्तीचे बँकचे डिटेल्स आणि ओटीपी क्रमांक मिळवला.   

8/10

FASTag Recharge scam Man loses Rs 2 lakh 40000 after installing mobile app

यानंतर या सायबर चोराने 2.4 लाख रुपये या व्यक्तीच्या खात्यावरुन आपल्या खात्यावर परस्पर वळून घेतले. 

9/10

FASTag Recharge scam Man loses Rs 2 lakh 40000 after installing mobile app

पैसे काढून घेण्यात आल्याचा मेसेज आल्यानंतर या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा रिचार्ज करणाऱ्या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचं समजलं.

10/10

FASTag Recharge scam Man loses Rs 2 lakh 40000 after installing mobile app

या प्रकरणात सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.