'तो' सीन शूट करण्याआधी मोठमोठ्याने रडली माधुरी दीक्षित; अभिनेता म्हणाला, 'सर्वांनी तिच्याभोवती घोळका..'

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason: 90 चं दशक आपल्या अभिनयाने गाजवणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितने एका कलाकारामुळे संपूर्ण चित्रपटालाच नकार दिला होता. ती या चित्रपटाच्या शुटींगच्या वेळेस मेकअप रुममध्ये जाऊन भरपूर रडायची, असा खुलासा ती ज्या व्यक्तीमुळे रडायची तिनेच केला आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण...

| Jan 18, 2024, 10:24 AM IST
1/11

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason Says ranjeet villain

बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा विलन्सची चर्चा होते तेव्हा रंजीत यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. रंजीत यांचं नाव घेतल्याशिवाय बॉलिवूडमधील खलनायकांची यादी पूर्ण होऊच शकत नाही. रंजीत यांनी अनेक अशा भूमिका साकारल्या आहेत ज्यामध्ये ते प्रमुख महिला पात्रांवर अत्याचार करताना दाखवण्यात आले आहेत.

2/11

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason Says ranjeet villain

रंजीत यांनी अनेक चित्रपटांमध्ये लैंगिक छळ करणारे, बलात्काराचे आणि छेडछाडीचे सीन्स दिले आहेत. याच कारणांमुळे त्यांची प्रेक्षकांमध्ये अगदी नकारात्मक प्रतिमा तयार झाली होती. त्या काळातील अनेक अभिनेत्रींनीही रंजीत यांची धास्ती घेतली होती अशी चर्चा मनोरंजन सृष्टीत होती.

3/11

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason Says ranjeet villain

रंजीत यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असाच एक किस्सा सांगितला. त्या काळातील आघाडीची अभिनेत्री माधुरी दीक्षितने रंजीत यांच्याबरोबरचा एक तसला सीन शूट करावा लागेल म्हणून जवळपास संपूर्ण चित्रपटच नाकारला होता. 

4/11

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason Says ranjeet villain

माधुरीला रंजीत यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायची नव्हती म्हणून तिने 'प्रेम प्रतिज्ञा' नावाच्या चित्रपटाला नकार दिलेला. 

5/11

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason Says ranjeet villain

'रेडिओ नशा'बरोबर बोलताना रंजीत यांनी अॅक्शन डायरेक्टर विरु देवगण यांनी माधुरीने चित्रपट नकारलेला अशी माहिती दिल्याचं सांगितलं. चित्रपटातील भूमिकांमुळे माझी अशी प्रतिमा लोकांच्या मनात तयार झाली होती की कोणत्याही मुलीला माझ्याबरोबर लग्न करायचं नव्हतं, असंही रंजीत यांनी सांगितलं. 

6/11

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason Says ranjeet villain

हिरोईन्सची साडी ओढणे, केस ओढणे, बलात्कार करणे, लैंगिक अत्याचार करण्याचे अनेक सीन्स मी भूमिका साकारताना केले. या सीन्सच्या शेवटी मी हिरोकडून मार खायचो. मात्र याच सिन्समुळे माझी नकारात्मक प्रतिमा तयार झाल्याचं रंजीत म्हणाले.

7/11

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason Says ranjeet villain

'प्रेम प्रतिज्ञा'चा किस्सा सांगताना रंजीत यांनी, "माधुरीने जवळपास चित्रपटाला नकारच दिला होता. ती मेकअप रुममध्ये रडत बसली होती. तिला तो सीन करायचा नव्हता. मला कळतच नव्हतं की नेमकं काय सुरु आहे. मी सेटवर 2 तासांसाठीच यायचो. चित्रपटामध्ये माधुरीने एका गरीब व्यक्तीच्या मुलीची भूमिका साकारली होती. मी तिची छेड काढतो असा एक सिन होता," असं सांगितलं.

8/11

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason Says ranjeet villain

"फाइट मास्टर वीरु देवगण यांनी मी न थांबता पूर्ण सीन शूट करणार आहे असं सांगितलं होतं. प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होईल. सामान्यपणे शुटींग झाल्यानंतर सीन कसा झाला असं मला विचारलं जायचं. मात्र माधुरी असलेला सीन शूट केल्यानंतर माझ्याकडे कोणीच आलं नाही. सर्वजण माधुरीच्या आजूबाजूला घोळका करुन उभे होते. माधुरीने त्यावेळेस सेटवरील लोकांशी बोलताना, त्याने (रंजीत यांनी) मला स्पर्श केल्याचं जाणवलंही नाही असं म्हटलं होतं. ही माझ्यासाठी फार मोठी बाब होती. मी प्रत्येक महिलेचा सन्मान करतो," असं रंजीत म्हणाले.

9/11

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason Says ranjeet villain

छेडछाडीच्या सीनबद्दल बोलताना रंजीत यांनी, "हे सीन्स उत्तमप्रकारे कोरिओग्राफ केलेले असतात. एखादा डान्स ठरवला जातो तसाच हा प्रकार असतो. आम्ही बलात्काराचा सीन शूट करण्याआधी खऱ्या आयुष्यात झालेल्या बलात्काराचा अभ्यास केला आहे, असं कधीच घडत नाही," असंही स्पष्ट केलं.

10/11

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason Says ranjeet villain

"मी माझ्या सहअभिनेत्रीला सांगायचो की माझे केस ओढा, मला ओरबाडा. असं केल्यास सीन अगती उत्तम प्रकारे साकारता येतो आणि अभिनेत्रीला थोडा विश्वास वाटतो," असंही रंजीत यांनी सांगितलं. 

11/11

Madhuri Dixit Cried On Sets Of Film For This Strange Reason Says ranjeet villain

‘सावन भादो’, ‘आपकी कसम’, ‘नागिन’, ‘अमर अकबर एंथनी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘लावारिस’, ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘करण अर्जुन’, ‘कोयला’ आणि ‘हाउसफुल 2’ यासारख्या 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.