महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित गाव; इंथ घरं काय, बँकांनाही दरवाजे नाहीत, तरीही कधीच होत नाही चोरी

शिंगणापूर गावात शनिदेवाचा अद्भुत चमत्कार पहायला मिळतो. येथे घरांना दरवाजे नसताना देखील चोरीच्या घटना घडत नाहीत. 

| Jun 01, 2024, 17:53 PM IST

Facts About Shani Shingnapur : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनि शिंगणापूर हे जागृत देवस्थान आहे. शनि मंदिरामुळे गावाच्या नावात शनि जोडले गेले आहे. अहमदनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. 

1/7

भारतातच काय संपूर्ण जगात कुठेही दरवाजे नसलेले एकही घर सापडणार नाही. महाराष्ट्रात मात्र, असे एक गाव आहे जेथे घरं काय, बँकांना देखील दरवाजे नसतात.  

2/7

शनि शिंगणापूर गावातील लोकांची शनि देवावर प्रचंड श्रद्धा आहे. यामुळेच कोणी घरांना दरवाजे लावण्याचा प्रयत्न देखील करत नाही. 

3/7

गावात कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामागे साडेसात वर्षांच्या अशुभ कालावधीचा शाप शनि देव देतात असे येथील ग्रामस्थ मानतात.

4/7

घरांना दरवाजे नसतानाही गावात चोरीसारख्या घटना घडत नाहीत. यामुळेच इथे घरं, सर्व कार्यालये तसेच बँंकाना देखील दरवाजे नाहीत.

5/7

 शनि शिग्नापुर गावातील स्थानिक लोकांना असा विश्वास आहे गावातील शनिदेव त्यांचे संरक्षण करतो, आणि प्रत्येक संकटातून वाचवतो.  

6/7

शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात. 

7/7

शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे जीथे घरांना दरवाजे नसतात. यामागे एक रहस्यमयी कारण आहे.