अद्वितीय! आकाशगंगेत पहिल्यांदाच पाहायला मिळालं 'शिव'-'शक्ति'चं मिलन; दृश्य पाहून तज्ज्ञही हैराण

ESA Discovers 'Shiva' and 'Shakti': सूर्याहूनही अनेक मोठे तारे असणाऱ्या या अंतराळातील भारावणाऱ्या हालचाली टीपण्यासाठी विविध देशातील अंतराळ संशोधन संस्थांनी दुर्बिणी लावल्या आहेत. 

Mar 22, 2024, 11:41 AM IST

Milky Way galaxy: अंतराळाची कैक गुपितं आजवर जगासमोर आली आहेत. पण, काही गुपितं मात्र अद्यापही त्या अंतराळातच असून, तिथपर्यंत पोहोचणंही जवळपास अशक्यच. अशा या अद्वितीय अंतराळातील कमाल घटनेनं जगभरातील खगोलशास्त्रज्ञांना आणि अंतराळविषय अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांना हैराण केलं आहे. 

1/7

ESA

ESA galaxy european space agencys Discovers Shiva and Shakti

युरोपीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ESA याच अंतराळातून एक असं दृश्य जगासमोर आणलं आहे जिथं 'शिव' आणि 'शक्ती' नावांच्या ताऱ्यांचं अद्भूत मिलन पाहायला मिळालं. आकाशगंगेच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या या ताऱ्यांची अशी स्थिती पाहायला मिळणं ही मोठी बाब. 

2/7

गाया दुर्बिण

ESA galaxy european space agencys Discovers Shiva and Shakti

युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेनं गाया दुर्बिणीच्या माध्यमातून हे रहस्य जगासमोर आणलं. जिथं अतीप्राचीन तारे सर्वांसमोर आले. असं म्हटलं जातं की हे दोन तारे अतिशय महत्त्वाचे असून कैक अब्ज वर्षांपूर्वी त्यांची उत्पत्ती झाली होती. 

3/7

आकाशगंगेचा व्यास

ESA galaxy european space agencys Discovers Shiva and Shakti

आकाशगंगेमध्ये अब्जो तारे, ग्रह, लघुग्रह आणि इतर खगोलीय पिंडांव्यतिरिक्त सौरमालेचाही समावेश आहे. या आकाशगंगेचा व्यास साधारण 100,000 प्रकाशवर्ष असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. 

4/7

ब्रह्मांड

ESA galaxy european space agencys Discovers Shiva and Shakti

गाया दुर्बिणीनं नुकत्याच टीपलेल्या दृश्यांमुळं ब्रह्मांड आणि आकाशगंगेच्या भूतकाळात डोकावण्याच्या शक्यता आणखी बळकट केल्या. 

5/7

आकाशगंगेची कैक रहस्य

ESA galaxy european space agencys Discovers Shiva and Shakti

शिव आणि शक्ती या दोन ताऱ्यांच्या मिलनाचं दृश्य समोर आल्यामुळं आता आकाशगंगेची कैक रहस्य उलगडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

6/7

गाया स्पेसक्राफ्ट

ESA galaxy european space agencys Discovers Shiva and Shakti

गाया स्पेसक्राफ्ट ही युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेची एक योजना असून, त्या माध्यमातून ताऱ्यांचं अचूक स्थान आणि त्यांच्या आकाराची माहिती मिळते. 

7/7

तारे आणि त्यांचे गुणधर्म...

ESA galaxy european space agencys Discovers Shiva and Shakti

आकाशगंगेत सद्यस्थितीला असणारे तारे आणि त्यांच्या गुणधर्मांची माहिती या मोहिमेतून सातत्यानं मिळत असते.