रब ने बना दी जोडी! रकुल प्रीत आणि जॅकी भगनानीच्या लग्नाचे पहिले फोटो समोर

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding Photos : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा शाही विवाह सोहळा आज गोव्यात पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर होतायत याची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. रकुल आणि जॅकीने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. दोघांची जोडी अतिशय सुंदर दिसत आहे. 

राजीव कासले | Feb 21, 2024, 21:23 PM IST
1/5

रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांनी आपल्या लग्नाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही आनंदी आणि सुंदर दिसतायत. अनेक महिन्यांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर आज दोघं सात जन्मांसाठी एक झाले. 

2/5

रकुल प्रीतने लग्नासाठी युनिक स्टाईल पोशाख निवडला होता. लाईट पिंक रंगाच्या या पोशाखवर बारीक नक्षीकाम करण्यात आलं आहे. तर जॅक भगनानी सिल्व्हर रंगाच्या शेरवानीत एखाद्या महाराजासारखा दिसतोय.

3/5

दोघांच्या पोशाखाला साजेशी अशी त्यांच्या गळ्यात वरमाला आहे. वरमाला बनवण्यासाठी वेगवेगळ्या महागड्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. 

4/5

रकुल आणि जॅक गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आज अखेर त्यांनी त्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केलीय. गोव्यात पार पडलेल्य शाही विवाहसोहळ्यात दोघांनी सात फेरे घेतले. 

5/5

रकुल आणि जॅकीच्या विवाह सोहळ्यासाठी त्यांचं कुटुंब आणि खास पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं.