ना शाहीर पनीर, ना गुलाबजाम! अमिताभ-जया बच्चन यांच्या लग्नात काय होता मेन्यू... बिग बींनी सांगितला किस्सा

Amitabh-Jaya Wedding : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्या लग्नाची पत्रिका काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण तुम्हाला माहित आहे का अमिताभ-जयाच्या लग्नात जेवणाचा मेन्यू काय होता. स्वत: बिग बींनी याबाबतचा खुलासा केला आहे. 

राजीव कासले | Oct 26, 2024, 15:55 PM IST
1/8

ना शाहीर पनीर, ना गुलाबजाम! अमिताभ-जया बच्चन यांच्या लग्नात काय होता मेन्यू... बिग बींनी सांगितला किस्सा

2/8

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधलं मोस्ट पॉवरफुल कपल मानलं जातं. दोघांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहित आहे. 3 जून 1973 ला दोघांनी लग्न केलं आणि तेव्हापासून तब्बल पन्नास वर्ष दोघ एकमेकांना प्रत्येक सुख-दु:खात साथ देत आहेत. अमिताभ बच्चन यांचं वय आता 82 वर्ष आहे तर जया बच्चन यांचं वय 76 वर्ष आहे. अमिताभ बच्चन अनेकवेळा जया बच्चन यांच्याबरोबरचे मजेदार किस्से चाहत्यांबरोबरच शेअर करत असतात.

3/8

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्या लग्नाची पत्रिका काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण तुम्हाला माहित आहे का अमिताभ-जयाच्या लग्नात जेवणाचा मेन्यू काय होता. स्वत: बिग बींनी याबाबतचा खुलासा केला आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अमिताभ यांनी एका स्पर्धकाच्या प्रश्नावर उत्तर दिलंय. 

4/8

'कौन बनेगा करोडपती 16' च्या सेटवर नव्या एपिसोडमध्ये हॉट सीटवर ओडिशाची श्रावणी नावाची स्पर्धक आहे. गेम खेळत असाताना श्रावणीने आपल्या होणाऱ्या पतीबद्दल अमिताभ यांना सांगितलं. यावेळी बिग बी यांनी श्रावणीला लग्नात मेन्यू काय असणार याची विचारणा केली. 

5/8

अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नावर श्रावणीने मेन्यूत शाही पनीर, नान, गुलाबजाम असल्याचं सांगितलं. नंतर श्रावणीने अमिताभ यांना त्यांच्या लग्नावेळी काय मेन्यू होता असा प्रश्न विचारला. यावर महानायक अमिताभ यांनी दिलखुलास उत्तर दिलं. 

6/8

आमच्या लग्नावेळी अशी काहीही पद्धत नसल्याचं अमिताभ यांनी सांगितलं. एक दिवस चालता-फिरता आम्ही लग्न करण्याचं ठरलं आणि दोघांनी लग्न केलं. त्यानंतर जया भादुरी यांना घरी घेऊन गेलो. त्या दिवशी घरात जे जेवण बनलं होतं तेच आम्ही खाल्लं अशी आठवण अमिताभ यांनी सांगितली.   

7/8

आमच्या लग्नात कोणाताही ताम-झाम नव्हता. अमिताभ आणि जया यांनी लग्नाची गोष्ट खासगीत ठेवली होती. अगदी जवळचे मित्र आणि मोजके नातेवाईक या लग्नात सहभागी झाले होते. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर वराती म्हणून केवळ पाच लोकं होती.

8/8

3 जून 1973 ला अमिताभ आणि जया यांनी लग्न केलं. त्याच दिवशी दोघं जण लंडनसाठी रवाना झाले. लंडनवरुन परतल्यानंतर अमिताभ यांच्या सासरी एक छोटेखानी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं.