IND vs ENG: राजकोट एअरपोर्टवर इंग्लंड खेळाडू रेहान अहमदला अडवलं, हे होतं मोठं कारण

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील रोमांचक 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पाहुण्या इंग्लंडची टीम या सामन्यासाठी राजकोटला पोहोचलीये.

Surabhi Jagdish | Feb 13, 2024, 12:54 PM IST
1/7

दरम्यान यावेळी नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंग्लंडच्या एका खेळाडूला अडचणीचा सामना करावा लागतोय. 

2/7

इंग्लंडची टीम राजकोटला उतरली तेव्हा एक खेळाडू व्हिसाच्या समस्येमुळे थांबला होता.   

3/7

तो खेळाडू दुसरा कोणी नसून त्यांचा युवा लेगस्पिनर रेहान अहमद होता.

4/7

मिळालेल्या माहितीनुसार, 'रेहान अहमदच्या व्हिसामध्ये काही तांत्रिक समस्या होती, त्यामुळे त्याला विमानतळावर थांबवण्यात आलं होतं.

5/7

संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स रेहानसोबत असल्याचीही माहिती मिळाली.   

6/7

रेहानला एअरपोर्टवरून सुटका होईपर्यंत टीमने सुरुवातीला विमानतळावरून हॉटेलकडे जाण्यास नकार दिला.   

7/7

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हा वाद मिटल्यानंतर त्यांनी तेथून हॉटेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतर टीम हॉटेलमध्ये पोहोचली आहे.