उकडलेल्या अंड्याचे पाणी फेकून देताय? घरामध्ये करा असा वापर

अंडी उकडल्यानंतर त्याचे पाणी फेकून देताय. पण त्याचे हे फायदे वाचाल तर तुम्ही असे कधीच करणार नाही. जाणून घ्या सविस्तर

| Oct 23, 2024, 18:29 PM IST
1/7

व्हिटामिन डी

उकडलेल्या अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटामिन डी असते. त्यामुळे अनेक जण रोज एक उकडलेले अंड खाण्याचा सल्ला देतात. 

2/7

उकडलेली अंडी

अनेक जण जिमला जाणारे किंवा व्याधीग्रस्त लोक सकाळी किंवा संध्याकाळी उकडलेली अंडी खात असतात. 

3/7

पाणी फेकून देताय

तुम्ही पण उकडलेल्या अंड्याचे पाणी फेकून देताय. मग आता तुम्ही ही चूक करू नका. त्या पाण्याचा योग्य वापर करा. 

4/7

हा आहे फायदा

उकडलेल्या अंड्याचे पाणी खूप फायदेशीर असते. या पाण्याचा अनेक कारणांसाठी वापर केला जातो. 

5/7

पोषक तत्वे

अंडी उकडल्यानंतर त्या अंड्यामधील पोषक तत्वे ही त्या पाण्यामध्ये मिसळतात. त्यामुळे ते पाणी फेकून देऊ नका.

6/7

झाडांसाठी उपयुक्त

अंडी उकडल्यानंतर तुम्ही ते पाणी तुमच्या घरातील किंवा परिसरातील झाडांमध्ये टाकू शकता. त्यामुळे झाडांना पोषकतत्वे मिळतात. 

7/7

झाडांची वाढ

उकडलेल्या अंड्याचे पाणी झाडांसाठी खत म्हणून काम करते. त्यामुळं झाडांची वाढ चांगली होते. त्यासोबतच अंड्याचे कवचही फायदेशीर आहे. यापासून तुम्ही नैसर्गिक खत बनवू शकता.