रणबीर, टायगर, सनी लिओनीला ईडीची नोटीस, काय आहे महादेव APP प्रकरण?

Explainer: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला ईडीनं समन्स पाठवलाय. रणबीर कपूरला 6 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलवण्यात आलंय. महादेव अॅपप्रकरणी रणबीरची चौकशी करण्यात येणार आहे. रणबीरला महादेव अॅपची जाहिरात करणं भोवण्याची शक्यता आहे.  या अॅपच्या जाहिरातीप्रकरणी यापूर्वीच अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आलेली आहे. याआधी सनी लिओनीसह, भाग्यश्री, टायगर श्रॉफ यांचीही चौकशी झालीय.  आता रणबीरपर्यंत हे धागेदोरे गेले आहेत. त्यामुळे रणबीर कपूर अडचणीत येण्याची शक्यता आहे. आपण जाणून घेणार आहोत हे महादेव अॅप नेमकं आहे तरी काय?

| Oct 04, 2023, 19:10 PM IST
1/7

महादेव अॅप हे ऑनलाईन बेटिंग अॅप आहे. या अॅपद्वारे मनीलॉण्ड्रींग केलं जात असल्याचा संशय असून ईडीकडून कारवाई सुरु आहे. या कारवाईत आतापर्यंत 417 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने भोपाळ, कोलकाता आणि मुंबईत छापेमारी केली होती. 

2/7

महादेव अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याने युएईमध्ये स्वत:चं साम्राज्य उभं केलं आहे. दुबईतून हे बेटिंग अॅप चालवलं जातं. पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल यांसारख्या विविध लाइव्ह गेम्समध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे

3/7

ऑनलाईन सट्ट्याट्याच्या माध्यमातून सौरभ चंद्राकारने कोट्यवधींची माया गोळा केली आहे. चंद्राकार मुळचा भारतातल्या छत्तीसगडमधल्या भिलाई इथला आहे. सौरव चंद्राकारने रवी उप्पल नावाच्या साथीदारासह ऑनलाईन बेटिंग अॅप सुरु केलं. याला महादेव हे नाव दिलं. या अॅपचा टर्नओव्हर जवळपास वीस हजार कोटी रुपये इतका आहे.   

4/7

सौरभ चंद्राकारचं भिलाईमध्ये महादेव नावाचं एक छोटसं ज्यूस सेंटर होतं. त्यावेळी तो स्वत: ऑनलाईन सट्टा लावायचा. यामध्ये त्याला 10 ते 15 लाख रुपयांचं नुकसान झालं. बेटिंगमुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आणि वसुलीसाठी तगादा लागला. त्यामुळे चंद्रकार आणि रवी उप्पल दुबईला पळून गेले. 

5/7

दुबईमध्ये सुरुवातील दोघांनी लहान-सहान काम करत थोडेफार पैसे जमवले आणि त्यातून स्वत:चं महादेव बूक अॅप नावाचं ऑनलाईन बेटिंग अॅप सुरु केलं. काही काळातच हे अॅप प्रसिद्ध झालं. लाखो लोकांनी या अॅपवरुन ऑनलाईन बेटिंग सुरु केली. भारतात या अॅपवर बंदी असली तरी इतर काही देशांमध्ये हे अॅप सुरु आहे. 

6/7

सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे दुबईतून हे बेटिंग अ‍ॅप चालवतात. या अ‍ॅपचे नेटवर्क नेपाल, बांगलादेशसह इतर अनेक देशांमध्ये पसरलं आहे. या अॅपच्या माध्यमातून दोघांनी कोट्यवधी रुपय कमावले आहेत. 

7/7

सौरव चंद्राकारचा यावर्षीच फेब्रुवारीमध्ये शाही विवाह पार पडला. लग्नासाठी त्याने जवळपास 200 कोटी रुपयांची उधळपट्टी केली. या लग्नाची जगभरात चर्चा झाली. भारतात राहाणाऱ्या नातेवाईकांना दुबईत आणण्यासाठी त्याने चक्क प्रायव्हेट जेट बूक केले होते. तसंच डान्सर, डेकोरेटरही त्याने खास भारतातून दुबईत आणले होते.