Intestine Cleansing Fruits: रिकाम्या पोटी 'ही' पाच फळे खा; पचनाची समस्या होईल दूर

Intestine Cleansing Fruits : आपल्या सगळ्यांना खाण्याची आवड असते. पण अशा बरेच खाद्य पदार्थ असतात ते खाल्ल्यानं आपल्याला त्रास होतो. बरेच पदार्थ हे पचायला जड असतात. त्यामुळे पोट दुखीसारखी समस्या उद्भवते. जर तुम्हाला अपचन आणि बद्धकोष्ठतासारख्या अनेक समस्या निर्माण होतात. अशात आपण काय करायला हवं असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. चला तर जाणून घेऊया कोणती फळं खाल्ल्यानं आपण या समस्येपासून लांब राहू शकतो. ते सुद्धा सकाळी सकाळी खाल्यानं होतील जास्त फायदे...

| May 19, 2023, 18:52 PM IST
1/7

सफरचंद

Intestine Cleansing Fruits

सफरचंदमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यासोबत पाणी देखील असते. त्यामुळे आपल्या आतड्या हायड्रेटेड राहतात आणि अपचन किंवा बद्धकोष्ठतेच्या समस्या होत नाहीत. 

2/7

नासपती

Intestine Cleansing Fruits

पोट आणि आतड्यांमधून हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास नासपती मदत करत कारण सफरचंद प्रमाणे यातही फायबरचे प्रमाण जास्त असते.   

3/7

अॅव्होकाडो

Intestine Cleansing Fruits

अॅव्होकाडोमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि ग्लुटाथिओन आतड्यांना निरोगी ठेवण्याचे काम करते. त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळते. 

4/7

स्ट्रॉबेरी

Intestine Cleansing Fruits

स्ट्रॉबेरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. स्ट्रॉबेरी आतड्यांमध्ये निरोगी बॅक्टेरिया तयार करते. फायबरचे प्रमाण जास्त असल्यानं पचन क्रिया सोपी होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. 

5/7

केळी

Intestine Cleansing Fruits

केळी हा फायबरचा उत्तम स्रोत आहे. शरीरातील आतड्यांमध्ये साचलेला मल काढून टाकण्यासाठी हा उत्तम उपाय ठरू शकतो .  याशिवाय केळीत पोटॅशियम, जीवनसत्त्वे, फोलेट यांसारखे पोषक घटकही आढळतात. 

6/7

आतड्या निरोगी नसतील तर होऊ शकतात या समस्या

Intestine Cleansing Fruits

पोट फुगणे, अपचन, बद्धकोष्ठता,  आम्लपित्त, मूळव्याध, गॅस तयार होतो, अपचन आणि कोलन कर्करोग यासारख्या गंभीर आरोग्य समस्या उदभवण्याचा शक्यता असते. 

7/7

आतड्यांचे आरोग्य महत्त्वाचे

Intestine Cleansing Fruits

आपण जे खातो त्यातून आपल्या शरीराला गरजेचे पोषक तत्त्वे काढून घेते त्यातील गरजेचा नसलेला भाग मलाच्या रुपात बाहेर जाणं गरजेचं आहे. ते होत नसेल तर अनेकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. (All Photo Credit : File)