PHOTO: चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावले

China Three Gorges Dam :  जगातील सर्वात मोठं धरण चीन मध्ये आहे. जगातील हे सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी तब्बल 18 वर्षांचा कालावधी लागला. 1994 मध्ये या धरणाचे बांधकाम सुरू झाले.  2012 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले.  चीनच्या हुबेई प्रांतातील यांगत्से नदीवर बांधण्यात आले आहे.  ही जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे. हे धरण बांधण्यासाठी सुमारे 4 लाख 63 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. जवळपास 14 लाख घरं या धरणाच्या बांधकामामुळे प्रस्थापित झाली.  हे धरण पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरु शकते.   

Jul 10, 2024, 11:15 AM IST
1/7

जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. थ्री गॉर्जेस डॅम (Three Gorges Dam) असे या धरणाचे नाव आहे. हे धरणच पृथ्वीसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.     

2/7

या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग थोडा कमी झाला आहे.  एका दिवसाचा वेळ सुमारे  0.06  मायक्रोसेकंदांनी वाढला आहे.

3/7

या धरणात इतके पाणी जमा झाले आहे की पृथ्वीच्या जडत्वावर याचा परिणाम झाला आहे. या धरणामुळे पृथ्वीवर अनेक संकट ओढावू शकतात. 

4/7

हे धरण 2.3 किलोमीटर लांब, 115 मीटर रुंद आणि 185 मीटर उंच आहे. या धरणाच्या जलाशयात 42 अब्ज टन पाणी आहे. धरण परिसरात 6,400 वनस्पती प्रजाती, 3,400 कीटक प्रजाती, 300 माशांच्या प्रजाती आणि 500 ​​पेक्षा जास्त स्थलीय पृष्ठवंशीय प्रजाती आहेत. या बंधाऱ्यामुळे या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. या धरणामुळे दुष्काळ आणि रोगराईही वाढली आहे. 

5/7

या धरणामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूर गेले आहेत. या धरणाच्या बांधकामामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुव आपापल्या ठिकाणाहून प्रत्येकी 2 सेमी सरकले आहेत. इतकचं नाही तर पृथ्वी देखील इतर ध्रुवांवर थोडीशी सपाट झाली आहे. 

6/7

या धरणामुळे पृथ्वीची फिरण्याचा गती मंदावली आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी 2005 मध्ये थ्री गॉर्जेस धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कमी झाल्याचा अंदाज वर्तवला होता. वस्तुमानातील बदलामुळे एका दिवसाची वेळ 0.06 मायक्रोसेकंदांनी वाढली आहे.  

7/7

जगातील सर्वात मोठा जलविद्युत  प्रकल्प याच धरणावर आहे. हे धरण दोन मोठ्या फॉल्ट लाईनवर बांधले आहे. त्यामुळे येथे भूकंप होतात.