गौतम गंभीरची 'नॅशनल ड्युटी' कधीपासून सुरू? बीसीसीआयने दिली तारीख

Gautam Gambhir On National Deuty : क्रिकेट सल्लागार समितीने अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुश्री सुलक्षणा नाईक यांनी मंगळवारी एकमताने गौतम गंभीरची टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून शिफारस केली होती. अशातच आता त्याची नियुक्ती झालीये.

| Jul 09, 2024, 23:25 PM IST
1/5

हेड कोच गौतम गंभीर

बीसीसीआयने क्रिकेट सल्लागार समितीचा अहवाल आल्यानंतर गौतम गंभीरची हेड कोच म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे आता तो पुन्हा टीम इंडियाचा भाग झाला आहे.

2/5

श्रीलंका मालिका

गौतम गंभीर श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेतून जबाबदारी स्वीकारेल, जिथं टीम इंडिया 27 जुलै 2024 पासून 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. 

3/5

नॅशनल ड्युटी

गौतम गंभीरचं नाव जाहीर झाल्याने आता 27 जुलैपासून गंभीर पुन्हा नॅशनल ड्युटीवर दिसेल. गंभीर टीम इंडियामध्ये कोणते बदल करणार? यावर देखील सर्वांचं लक्ष असेल.

4/5

गौतम गंभीर जबाबदार

गौतम गंभीरकडे भारतीय क्रिकेट संघाच्या विकास आणि कामगिरीवर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार असेल, असं बीसीसीआयने प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे. 

5/5

शिस्त आणि टीमवर्क

गंभीरचे लक्ष उत्कृष्टता, शिस्त आणि टीमवर्कची संस्कृती विकसित करण्यावर असेल, तसेच तरुण प्रतिभेचं संगोपन करणं आणि जागतिक स्तरावरील भविष्यातील आव्हानांसाठी संघाला तयार करणं, असं बीसीसीआयने म्हटलंय.