जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

या वादळी वाऱ्यात 'आधार'वडाची मोठी हानी 

| Aug 07, 2020, 12:59 PM IST

मुंबई : जातीच्या कलावंताची पंढरी म्हणजे मुंबईतील सर जे जे स्कूल ऑफ आर्ट. या महाविद्यालयातील कॅन्टींग शेजारील असलेलं वडाचं झाडं गेल्या तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसात कोसळलं. हजारो कलाकार मायेची सावली देणारं 'आधार'वड गेल्याचं दुःख व्यक्त करत आहेत. 

1/7

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

 गेली अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस झेलत उभं असलेल हे वडाचं झालं अनेकांच्या हक्काचं ठिकण होतं. जे जे मधील लक्ष्मणच्या कॅन्टीनसमोरील या वडाने हजारो कलाकारांच्या सुख-दुःखात सहभाग घेतला होता. या वडाच्या कुशीत अनेक कलाकारांना आधार शोधला होता. हाच आधार या पावसात कोलमडला आहे. 

2/7

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

गेले तीन दिवस मुंबईसह अनेक उपनगरात मुसळधार पाऊस झाला. यावेळी मुसळधार पावसासह वादळी वारा देखील जोरात वाहत होता. अशावेळी जे जे मधील हे वटवृक्ष कोसळलं. 

3/7

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

गेली अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस झेलत उभं असलेल हे वडाचं झालं अनेकांच्या हक्काचं ठिकण होतं. जे जे मधील लक्ष्मणच्या कॅन्टीनसमोरील या वडाने हजारो कलाकारांच्या सुख-दुःखात सहभाग घेतला होता. या वडाच्या कुशीत अनेक कलाकारांना आधार शोधला होता. हाच आधार या पावसात कोलमडला आहे. 

4/7

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

विद्यार्थ्यांच्या रोजच्या गलक्यात, पारावरच्या गप्पांत रंगणारा हा 'वड' उन्हाळी सुट्टीचा दीड महिना विद्यार्थ्यांविना कसाबसा काढायचा. यंदा चार महिने कुशीत कुणीच न दिसल्यामुळे बावरला होता का?, असा प्रश्न जे जे चा माजी विद्यार्थी भूषण वैद्य याला पडला आहे. 

5/7

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

जेजेचा वटवृक्ष कोसळला म्हणजे ते फक्त एक झाड पडलं असं नाहीये, तर कित्येक तपं उभा असलेला एक महापुरुष होता तो, त्याच्या पारावर बसलेल्या कित्येक दिग्गज कलावंतांच्या गप्पा ऐकलेल्या आहेत त्याने. 

6/7

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

अनेक कलावंतांच्या पिढ्या घडताना पाहिलेल्या या वडाने आपल्या अंगा खांद्यावर कित्येक पक्षांची घरटी सांभाळत त्यांना 'आधार' दिलाय. पण; आता उरल्यात त्या फक्त आठवणींच्या पारंब्या! खोल मनात रुजलेल्या. खोड होऊन वाढणाऱ्या, त्या वटवृक्षासारख्याच.

7/7

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

जेजेच्या कलावंताचा 'आधार'वड गेला...

जेजेचे माजी विद्यार्थी आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. अनेक दशके हजारो कलाकारांना मायेची सावली देणारा जे. जे. च्या कॅन्टींग शेजारील हा वृक्ष परवाच्या वादळात कोसळला. आम्हा सर्व जे. जे. करांसाठी ही अत्यंत दु:खद घटना आहे...