DRDO नं तयार केलेलं बुलेटप्रूफ जॅकेट जवानांसाठी ठरणार वरदान; 6 गोळ्यांचा मारा परतवून लावण्याची ताकद

DRDO Develops the lightest Bulletproof jacket : शत्रूच्या 6 गोळ्या झेलूनही भारतीय जवांनांना नाही होणार इजा; DRDO नं तयार केलेलं बुलेटप्रूफ जॅकेट पाहिलं?   

Apr 25, 2024, 12:19 PM IST

DRDO Develops the lightest Bulletproof jacket : भारतीय लष्कराच्या वतीनं काळानुरूप लष्कराच्या अनेक तंत्रांमध्येही बदल करण्यात आले आहेत. यातच आता आणखी एका नव्या तंत्राची भर पडली असून, त्याची मोठी मदतही होणार आहे. 

1/7

DRDO

DRDO Develops the lightest Bulletproof jacket its photos and features

शत्रूच्या 6 गोळ्या झेलूनही भारतीय जवांनांना नाही होणार इजा; DRDO नं तयार केलेलं बुलेटप्रूफ जॅकेट पाहिलं? 

2/7

बुलेटप्रूफ जॅकेट

DRDO Develops the lightest Bulletproof jacket its photos and features

डीआरडीओच्या वतीनं नुकतीच भारतीय लष्करातील जवानांचं हित लक्षात घेत आव्हानात्मक परिस्थितीमध्येही त्यांच्या मदतीचं ठरणारं एक बुलेटप्रूफ जॅकेट तयार केलं आहे. 

3/7

जवानांचं रक्षण

DRDO Develops the lightest Bulletproof jacket its photos and features

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं तयार केलेल्या या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये शत्रूच्या सहा गोळ्यांचा मारा झाला तरीही जवानांचं रक्षण करण्याची क्षमता आहे. 

4/7

हलकं जॅकेट

DRDO Develops the lightest Bulletproof jacket its photos and features

देशातील हे सर्वात हलकं जॅकेट असून, ते तयार करण्यासाठी पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटचा वापर करण्यात आला आहे. 6 स्नायपर बुलेटही या जॅकेचचं नुकसान करू शकलेल्या नाहीत. 

5/7

जवानांना मोठा दिलासा

DRDO Develops the lightest Bulletproof jacket its photos and features

सध्याच्या घडीला लष्करातील जवानांच्या वापरात असणारं बुलेटप्रुफ जॅकेट जास्त वजनाचं असून, त्यामुळं जवानांना काही अडचणींचा सामना करु शकतो. त्यामुळं हे नवं जॅकेट जवानांना मोठा दिलासा देऊ शकतं असंही म्हटलं जात आहे.   

6/7

डीआरडीओ कानपूर

DRDO Develops the lightest Bulletproof jacket its photos and features

डीआरडीओच्या कानपूर येथील डिफेन्स मटेरिअल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंच एस्टॅब्लिशमेंटनं हे जॅकेट तयार केलं असून त्याची चाचणी चंदीगड येथे करण्यात आली आहे. 

7/7

परीक्षण

DRDO Develops the lightest Bulletproof jacket its photos and features

बीआयएस 17051-2018 नुसार परीक्षण करण्यात आलेलं हे जॅकेट लवकरत भारतीय लष्कराच्या वापरात येण्याची चिन्हं असून आता Front Line वर त्याचा वापर नेमका किती परिणाम करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.