रात्रभर कुत्रा बिबट्यासोबत असूनही सुरक्षित, पाहा PHOTOS

पाठलाग करण्याच्या नादात बिबट्या आणि श्वान एकाच टॉयलेटमध्ये अडकले. पुढे काय झालं पाहा PHOTOS

Feb 04, 2021, 13:48 PM IST
1/5

कसे शिरले दोघं एकाच ठिकाणी

कसे शिरले दोघं एकाच ठिकाणी

वाघ आणि श्वान यांच्यातील भांडणं अनेकवेळा पाहिली असतील. पण एकाच टॉयलेटमध्ये श्वान आणि बिबट्या अडकल्याची घटना समोर आली. भटक्या श्वानाचा पाठलाग करण्याच्या नादात बिबट्या आणि श्वान एकाच टॉयलेटमध्ये अडकले. 

2/5

7 तास बिबट्या आणि कुत्रा एकाच टॉयलेटमध्ये

7 तास बिबट्या आणि कुत्रा एकाच टॉयलेटमध्ये

श्वान आणि बिबट्या एकाच टॉयलेटमध्ये 7 तासांपासून अडकून बसले होते. ही माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळल्यानंतर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी टीम आली. 

3/5

टॉयलेटमधून बिबट्या बाहेर येत नव्हता

टॉयलेटमधून बिबट्या बाहेर येत नव्हता

7 तासांपासून दोघंही एकाच टॉयलेटमध्ये अडकून होते. बिबट्यानं श्वानाला काही केलं नसेल ना याची चिंता सगळ्यांनाच होती. व्ही. करिकालन यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक प्रयत्न करुनही बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश मिळत नव्हतं.

4/5

चकवा देऊन बिबट्या फरार

चकवा देऊन बिबट्या फरार

टॉयलेटबाहेर बिबट्यासाठी पिंजरा ठेवण्यात आला होता. त्याशिवाय तो उडी मारून पळून जाऊ नये म्हणून चारही बाजूंनी जाळ्या लावण्यात आल्या होत्या. बऱ्याचवेळापासून बिबट्या त्यांना चकवा देत होता. वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या आलाच नाही. मात्र इतकी सुरक्षा करूनही तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. 

5/5

बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला नाही

बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला नाही

या घटनेमध्ये सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही. तर बिबट्या पळून गेल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्वानाला रेस्क्यू केलं. श्वानाला देखील बिबट्यानं कोणतीही दुखापत केली नाही. ही घटना कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात घडली आहे. किडू रिझर्व फॉरेस्टजवळ असलेल्या बिलीनेले गावातल्या कैपांबा येथील रेप्पांच्या फार्म हाऊसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.