तुम्हालाही 'या' सवयी आहेत? यकृत डॅमेज करण्यासाठी स्लो पॉयझनप्रमाणे करतात काम

लिव्हर आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक कार्यांमध्ये योगदान देतं. अशा परिस्थितीत यकृत निरोगी राहणं अत्यंत आवश्यक आहे.

| Apr 10, 2024, 12:20 PM IST
1/7

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अयोग्य जीवनशैलीमुळे यकृताशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं.

2/7

रोजच्या सवयी आहेत ज्या यकृताला नुकसान पोहोचवण्यासाठी स्लो पॉयझनप्रमाणे काम करतात. 

3/7

आज आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींबद्दल सांगत आहोत.

4/7

ओव्हर-द-काउंटर औषधांवर जास्त अवलंबून राहिल्याने यकृतावर ताण येऊ शकतो. औषधांच्या अतिसेवनाने यकृताची टॉक्सिसिटी वाढते. त्यामुळे औषधाचा अति प्रमाणात सेवन टाळा.

5/7

शारीरिक हालचालींचा अभावामुळे देखील यकृताच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे नियमित व्यायामाकडे लक्ष द्या.

6/7

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी राहिल्याने यकृताच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका.

7/7

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने फॅटी लिव्हरआणि सिरोसिस सारख्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत यकृताचे आरोग्य राखण्यासाठी दारू पूर्णपणे टाळावी.