वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू; शरीरात जाताच 'हे' 6 पदार्थ होतात विष

वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 10 वर्षाच्या मानवीचा मृत्यू झाला. जन्मदिनाच्या दिवशी मृत्यू होणे ही अतिशय धक्कादायक बाब आहे. असे काही पदार्थ आहेत जे पोटात गेल्यावर शरीरावर त्याचा विपरित परिणाम होतो. अगदी विषासमान कार्य करतात. 

| Apr 04, 2024, 18:02 PM IST

पंजाबमधील पटियाला येथे 10 वर्षीय मानवीचा वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर  मृत्यू झाल्याची घटना हृदयद्रावक आहे. मानवीच्या वाढदिवसासाठी ऑनलाइन केक मागवला होता. तो खाल्ल्यानंतर मुलांसह कुटुंबीयांची प्रकृती खालावली. या दरम्यान मानवीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

1/7

वाढदिवसाचा केक ठरला जीवघेणा

Do Not Eat these 6 foods

मानवीच्या कुटुंबाने ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्लिकेशनद्वारे केकची ऑर्डर दिली होती. केक खाल्ल्यानंतर मुलीसह अनेकांची प्रकृती खालावली. दुसऱ्या दिवशी मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांकडून तिला मृत घोषित करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, मानवी तिच्या मृत्यूच्या काही तास आधी केक कापताना आणि तिच्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहे. स्वतःचा वाढदिवसाचा केक मृत्यूचे कारण बनेल असे कोणालाही वाटले नव्हते. या घटनेमुळे अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत चिंता निर्माण झाली आहे. काही विदेशी खाद्यपदार्थ आहेत ज्यामध्ये अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात आणि ती जास्त काळ ठेवल्यास त्यात विषारी पदार्थ साचू शकतात, जे सर्वांनी टाळावे. अशावेळी खालील 7 पदार्थांचा समावेश टाळावा. 

2/7

केक आणि पेस्ट्री

Do Not Eat these 6 foods

केक आणि पेस्ट्री हे हल्ली सगळ्याच सेलिब्रेशनमध्ये महत्त्वाचे ठरले जाते. पण हे पदार्थ खाणे टाळले पाहिजे कारण या पदार्थांची एक्सपायरी डेट कळत नाही. कारण केकमध्ये वापरली जाणारी आयसिंग किती जुनी आहे याचा अंदाज लावता येत नाही. 

3/7

क्रिम रोल

Do Not Eat these 6 foods

अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच क्रिम रोल आवडतो. आरोग्यासाठी क्रिम रोल चांगला नसतो. या क्रिम रोलमध्ये जे क्रिम भरलं जातं ते मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे त्याचे प्रमाण भरपूर असते आणि ते किती जुनं आहे हे कळत नाही. त्यामुळे हे क्रिम ताजे असते की नाही याबद्दल शंका असते. 

4/7

ज्यूस

Do Not Eat these 6 foods

ज्यूस हे शरीरासाठी चांगले असते. पण हे ज्यूस घरी तयार केलेले असणे आवश्यक आहे. ज्यूस तयार करण्यासाठी वापरलेली फळं ही कशी होती किंवा त्याची प्रोसेस कशी होती, याबाबत आपण स्वच्छतेची काळजी घेतली की नाही याबाबत शंका असते. 

5/7

शेक

Do Not Eat these 6 foods

व्हीप्ड क्रिम आणि फ्रोझन टॉपिंग भरभरून असलेला शेक ऍलर्जीच कारण बनू शकते. या पदार्थांपासूनही दूर राहा कारण यामुळे विषबाधा येऊ शकते. त्यामुळे मिल्क शेक किंवा कोणताही शेक पिताना काळजी घ्या. अन्यथा घरीच तयार करा. 

6/7

सँडविच

Do Not Eat these 6 foods

 व्हेजिटेबल सँडविच, नॉन ग्रील्ड यामध्ये कच्चा भाज्यांचा समावेश असतो. ज्यांची चव खूप छान लागते. पण त्यातही एक्सपायरी डेट दिलेली नसते. ज्यामुळे पोटात संसर्ग आणि इतर प्रकारच्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यापासूनही दूर राहा.

7/7

सलाड

Do Not Eat these 6 foods

आजकाल वजन कमी करण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी बहुतेक लोकांना सलाड खायला आवडते. पण बाहेर मिळणारे सॅलड खाऊ नये. ते किती वर्षांपूर्वी कापले गेले होते आणि त्यात वापरलेले ड्रेसिंग किती जुने आहे हे तुम्हाला माहीत नाही.