महाराष्ट्रात अयोध्येचा फिल! प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिकृती आणि हजारो दिव्यांची रोषणाई

Diwali 2024:  भंडा-यातील खाम तलाव येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीजवळ पार पडला दीपोत्सव. 

| Nov 01, 2024, 19:42 PM IST

Bhandara Khamb Talav : सर्वत्र दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या अयोध्येचा फिल येत आहे. भंडा-यातील खाम तलाव येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीजवळ  दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

1/7

 भंडारा शहरातील खांबतलाव पूर्वीच्या काळापासून धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. या तलाव परिसरात सध्य अयोध्येचा फिल येत आहे.   

2/7

स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केले होते.   

3/7

हजारो नागरिक या दिपोत्सवात सहभागी झाले. तलाव परिसरात दिव्यांची सुंदर आरास करण्यात आली. या दीपोत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.   

4/7

तलाव परिसरात दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात 21 हजार दिवे लावण्यात आले.. तसेच अयोध्येची प्रतिकृती दीपोत्सवाच्या माध्यमातून उतरवण्यात आली होती...  

5/7

खाम दिलाव परिसरात दिवाळीनिमित्ताने आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेत येथे आयोजीत करण्यात आलेल्या दिपोत्सावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

6/7

या तलावात मध्यभागात एक दगडी खांब असल्यामुळे या तलावाचे नामकरण खांबतलाव असे झाले आहे. या तलाव परिसरात श्रीरामाची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे. तसेच तलाव परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. 

7/7

भंडा-यातील खाम तलाव येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीजवळ  दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संपूर्ण परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला आहे.