शाहरुख-माधुरी असतानाही फ्लॉप झालेला चित्रपट, रडून रडून बेहाल झाला होता दिग्दर्शक; लोक पैसे घेऊन पळून गेले

1997 मध्ये जेव्हा राकेश रोशन शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितसह 'कोयला' चित्रपटावर काम करत होते, तेव्हा सर्वांनाच फार अपेक्षा होत्या. राकेश रोशन या चित्रपटासाठी भरपूर पैसा ओतला होता. पण हा चित्रपट 1997 मधील सर्वात मोठा फ्लॉप ठरला. यानंतर वडील रडून रडून बेहाल झाले होते असा खुलासा आता ऋतिक रोशनने केला आहे.   

| Oct 09, 2024, 20:21 PM IST

1997 मध्ये जेव्हा राकेश रोशन शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितसह 'कोयला' चित्रपटावर काम करत होते, तेव्हा सर्वांनाच फार अपेक्षा होत्या. राकेश रोशन या चित्रपटासाठी भरपूर पैसा ओतला होता. पण हा चित्रपट 1997 मधील सर्वात मोठा फ्लॉप ठरला. यानंतर वडील रडून रडून बेहाल झाले होते असा खुलासा आता ऋतिक रोशनने केला आहे. 

 

1/8

1997 मध्ये 'खून भरी मांग', 'खुदगर्ज', 'करण अर्जुन' सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राकेश रोशन एका थ्रिलर-अॅक्शन चित्रपटासाठी तयारी करत होते. या चित्रपटासाठी त्यांनी पैसा ओतला होता. पण त्यांच्यावर या चित्रपटामुळे रडण्याची वेळ आली होती.   

2/8

हा चित्रपट आहे कोयला. या चित्रपटात शाहरुख खान, माधुरी दीक्षित, अमरीश पुरी अशी तगडी स्टारकास्त होती. शाहरुख खान चित्रपटात मुक्याची तर अमरीश पुरी यांनी व्हिलनची भूमिका साकारली होती. पण काही कारणास्तव प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नाही.   

3/8

राकेश रोशन यांचा मुलगा हृतिक रोशनने 'ईटीसी बॉलीवूड'ला दिलेल्या मुलाखतीत 'कोयला' चित्रपटाविषयी सांगितलं होतं. वडील दु:खात बुडून गेलेले तो कठीण काळ आपण विसरू शकत नाही, असं त्याने म्हटलं होतं.   

4/8

मला खूप काळजी वाटत होती. वडिलांना रडताना पाहून तो फार घाबरला होता. एकीकडे राकेश रोशन आपला मुलगा हृतिकला 2000 मध्ये 'कहो ना प्यार है' मधून लाँच करण्याच्या तयारीत होते आणि त्याआधीच त्यांना 'कोयला' मुळे मोठं नुकसान सहन करावं लागलं.   

5/8

हृतिक रोशनने सांगितलं होतं की, त्याने आपल्या वडिलांना केवळ दोनदाच भावनिक होताना पाहिलं आहे. एक 'कोयला'च्या वेळी आणि दुसरा 2013 मध्ये मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान. 'कोयला' फ्लॉप झाल्यामुळे त्यांना घरात अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं त्याने सांगितलं होतं.   

6/8

राकेश रोशन यांनी 'कोयला'मध्ये सर्व काही गुंतवलं होतं. पण बराच पैसा वाया गेला. दुसरं म्हणजे त्यावेळी काही लोक पैसे घेऊन पळून गेले. त्यामुळे अशा परिस्थितीत दिग्दर्शकाची अवस्था फारच वाईट झाली होती.  

7/8

असं सांगितलं जातं की, सनी देओलला आधी या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण अभिनेत्याला मूक पात्र साकारायचं नव्हतं. त्याला कथाही फार आवडली नव्हती.   

8/8

शाहरुख खानने 'कोयला'मध्ये मुक्या नोकर 'शंकर'ची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 1990 मध्ये आलेल्या हॉलिवूड चित्रपट 'रिवेंज'चा रिमेक होता. राकेश रोशन यांनी चित्रपटासाठी सुमारे 12 कोटी गुंतवले होते. शाहरुख खान आणि माधुरीसारख्या स्टारकास्टमुळेच हा चित्रपट आपले बजेट वसूल करू शकला, असं म्हटले जाते. पण राकेश रोशनच्या अपेक्षेइतका नफा या चित्रपटाला मिळाला नाही आणि लोकांनी चित्रपटाला फ्लॉप घोषित केले.