'खासगी क्षणी मला..', गंभीर आजाराबद्दल करण जोहरचा खुलासा; म्हणाला, '..म्हणून घालतो ओव्हरसाईज कपडे'

Director Karan Johar On His Health Struggle: दिग्दर्शक करण जोहर हा कोणताही सोहळा असो किंवा फोटोशूट असो किंवा अगदी सेटवर असो तो ओव्हर साइज कपड्यांमध्येच दिसतो. यामागील कारणाबद्दल त्याने एक धक्कादायक खुलासा करत त्याला असलेल्या एका आजाराबद्दलची माहिती दिली आहे. तो नेमकं काय म्हणाला आहे जाणून घ्या...

Swapnil Ghangale | Jul 07, 2024, 15:31 PM IST
1/9

Director Karan Johar Health

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर हा अनेक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आकाराची कपडे घातल्याचं दिसून येतं. करण कायमच ओव्हर साईज कपडे वापरतो. मात्र यामागील नेमकं कारण काय आहे याचा खुलासा त्यानेच केला आहे.  

2/9

Director Karan Johar Health

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये करण जोहरने त्याला बॉडी डिस्मॉर्फियाचा त्रास असल्याचं जाहीर केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून मी यावर मात करण्याचा प्रयत्न करतोय पण काहीही बदल झाला नाही असं करणणे फेई डिसोझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. यासाठी त्याने मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतल्याचंही सांगितलं.

3/9

Director Karan Johar Health

"मला बॉडी डिस्मॉर्फियाचा त्रास आहे. मला स्वीमिंग पूलमध्ये उतरतानाही फार अवघडल्यासारखं होतं. असं अवघडल्यासारखं वाटल्याशिवाय स्वीमिंग पूलमध्ये कसं उतरावं मला कळत नाही. मी यावर मात करण्याचा फार प्रयत्न केला," असं करण म्हणाला.

4/9

Director Karan Johar Health

"तुम्ही कितीही यशस्वी व्हा, तुम्ही स्वत:ला काय वाटेल ते समजा पण ही भावना मनातून जात नाही. त्यामुळेच मी ओव्हर साईज कपडे घालतो. मी वजन कमी केलं तरी मोठ्या आकाराची कपडे घालतो," असं करण म्हणाला.

5/9

Director Karan Johar Health

"मी सतत आपण स्थूल दिसतो या भावनेशी झगडत असतो. मी स्थूल आहे असं मला सतत वाटत राहतं," असं करण जोहर म्हणाला. "त्यामुळेच मी माझ्या शरीराचा कोणताही भाग दिसणार नाही याची काळजी घेतो," असंही करण म्हणाला.

6/9

Director Karan Johar Health

"वयाच्या आठव्या वर्षापासून आजपर्यंत काहीही बदललं नाही. मला माझ्या शरीराबद्दल कायमच अवघडल्यासारखं वाटतं. मी फार छान दिसतोय असं मला कधीच वाटत नाही. तुम्ही किती काहीही मिळवलं तरी ही भवाना तयार होत नाही," असं करण म्हणाला.

7/9

Director Karan Johar Health

"खासगी क्षणांमध्येही मला लाईट्स सुरु ठेवाव्या लागतात. यासाठी मी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्लाही घेतला आहे. यासारख्यामुळे मानसिक समस्या निर्माण झाल्या. मला यामुळे पॅनिक अटॅक आल्याने मी औषधोपचारही घेतले आहेत," असं करणने सांगितलं.

8/9

Director Karan Johar Health

'कॉफी विथ करण'च्या 8 व्या पर्वाच्या प्रमोशनदरम्यानही यापूर्वी करणने या समस्येबद्दल उघडपणे भाष्य केलेलं. पीटीआयशी बोलताना करणने, "माझ्याबरोबर किंवा इतर कोणाबरोबरही असं घडू शकतं. कधीतरी एखाद्या घटनेमुळे असं वाटू लागतं तर कधीतरी काहीही कारण नसताना अशी भावना निर्माण होते," असं करण म्हटलेलं.

9/9

Director Karan Johar Health

"मला वाटणाऱ्या या अस्वस्थ करणाऱ्या भावनेबद्दल बोलताना मी माझ्या आयुष्यातील एक गोष्ट शेअर करु इच्छितो एवढाच माझा हेतू असतो. मी यासाठी उपचार घेतोय हे सांगताना मला काहीही वाटत नाही," असंही करणने म्हटलेलं.