Karan Johar: 'दोघांनी होकार कळवला अन्...', धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या किसिंग सीनवर करण जोहर स्पष्टच म्हणाला!

Karan johar on Kissing scene: धर्मेंद्र (dharmendra ) आणि शबाना आझमी (shabana azmi) यांच्यातील किसिंग सीनची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यावर आता करण जोहरने खुलासा केलाय.

Aug 01, 2023, 15:59 PM IST

Dharmendra and Shabana azmi kissing scene: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत 53 कोटींहून अधिक कमाई केली आहे.  शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन, आलिया भट्ट, रणवीर सिंह या कलाकारांनी या चित्रपटात काम केलं आहे. धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यातील किसिंग सीनची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यावर आता करण जोहरने खुलासा केलाय.

1/5

करण जोहर म्हणतो...

शबाना आझमी आणि धर्मेंद्रजी हे दोघंही खूप मोठे कलाकार आहेत. त्यामुळे या लिपलॉक किसिंग सीनवरून मतभेद होण्याचा प्रश्नच नाही, असं करण जोहर म्हणाला आहे.

2/5

ठिक आहे करूया…

ज्यावेळी मी धर्मेंद्रजींना या सीनची कल्पना दिली. त्यावेळी त्यांना काहीच वाटलं नाही. ठिक आहे करूया…, असं म्हणत त्यांनी रिप्लाय दिला.

3/5

होकार कळवला

दोन ज्येष्ठ कलाकारांनी संपूर्ण चित्रपटात अतिशय उत्तम काम केलं आहे. त्यांनी मला त्या सीनसाठी होकार कळवला होता, असा खुलासा करण जोहरने केला.

4/5

शबाना आणि धर्मेंद्र

'अभी ना जाओ छोड कर' हे गाणं शबाना आणि धर्मेंद्र यांना सुट करणारं होतं. त्याचबरोबर जावेद अख्तर यांना कोणतीही अडचण नव्हती.

5/5

मला कधीच वाटलं नव्हतं

दरम्यान, या सीनवर इतका हंगामा होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. धर्मेंद्र सारख्या हिरोला कोणाला किस करू वाटणार नाही, असं म्हणत शबाना आजमी यांनी प्रतिक्रिया दिली होती.