रोहित शर्मा सलमान खानचा नातेवाईक! ऋतिका नाही तर 'या' महिलेमुळे दोघांचं कौटुंबिक नातं

Did You Know Rohit Sharma Is Relative Of Salman Khan: सध्या टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेला भारताचा हिटमॅन रोहित शर्मा हा बॉलिवूडचा भाईजान असलेल्या सलमानचा नातेवाईक आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही ना? पण हे खरं आहे. जाणून घेऊयात या दोघांच्या नात्याबद्दल...

| Jun 18, 2024, 16:12 PM IST
1/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि अभिनेता सलमान खान एकमेकांचे नातेवाईक असून एका महिलेमुळे हे दोघे एकमेकांशी वैयक्तिक आयुष्यात कनेक्टेड आहे. विशेष म्हणजे ही महिला रोहितची पत्नी नसून अन्य एक महिला आहे. ही महिला कोण आणि तिचं या दोघांशी काय कनेक्शन जाणून घ्या...

2/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा खेळत असलेल्या भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करतोय.  

3/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

खरं तर ज्या व्यक्तीला क्रिकेट ठाऊक आहे त्याला रोहित शर्मा कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांमध्येही रोहितची क्रेझ किती आहे हे यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दिसून येत आहे.

4/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

मात्र तुम्हाला रोहित शर्मा आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हे एकमेकांचे नातेवाईक आहेत हे असं सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल, हो की नाही? पण खरंच हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत.  

5/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोघांचं नेमकं नातं काय आणि ते एकमेकांचे नातलग कसे झाले? तर या प्रश्नातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे रोहित शर्माची पत्नी ऋतिका सजदेह!  

6/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

रोहित शर्मा आणि ऋतिका पहिल्यांदा एकमेकांना काही कामनिमित्त एका प्रोफेश्नल मिटींगमध्ये भेटले.

7/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

त्यावेळेस ऋतिका तिचा चुलत भाऊ बंटी सजदेहाच्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीमध्ये म्हणजेच 'कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स'मध्ये काम करत होती.

8/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

रोहित आणि ऋतिकाने एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर 2015 मध्ये विवाह केला.

9/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

लग्नानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2018 मध्ये रोहित आणि ऋतिका एका गोंडस मुलीचे पालक झाले. या दोघांच्या मुलीचं नाव समायरा असं आहे.

10/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

आता ऋतिका सलमानचं काय कनेक्शन आहे याबद्दल सांगायचं झालं तर ऋतिकाच्या चुलत बहिणी असलेल्या सीमाचं लग्न सलमानचा सख्खा भाऊ सोहेल खानबरोबर झालं होतं.  

11/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

ऋतिकाची चुलत बहीण सीमा सजदेहचं लग्न सोहेल खानबरोबर झालं होतं. सोहेल हा सलमानचा धाकटा भाऊ आहे.  

12/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

सीमा सजदेह 'नेटफ्लिक्स'वरील 'फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज' या शोमध्ये सहभागी झाली होती.   

13/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

सीमा सजदेहाचं सोहेलबरोबर 1998 मध्ये लग्न झालं. या दोघांचा संसार 24 वर्ष चालला.   

14/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

2022 मध्ये सोहेल आणि सीमाने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

15/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

सीमा आणि सोहेलला दोन मुलं आहे. निर्वाण आणि योहान अशी या मुलांची नावं आहेत.  

16/16

Rohit Sharma Is Relative Of Salman Khan

म्हणजेच 2015 ते 2022 दरम्यान अर्थात रोहित आणि ऋतिकाचं लग्न झाल्यापासून सोहेल आणि सीमाने वेगळं होण्याचा निर्णय घेईपर्यंत सलमान आणि रोहित शर्मामध्ये भावोजी आणि मेव्हण्याचं नातं होतं.