गणेशोत्सव काळात आणि पितृ पक्षापूर्वी तुमच्यासोबत 'या' घटना घडल्या? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर...

Pitru Paksha : देशभरात गणेशोत्सवामुळे वातावरण आनंदायी आणि गणेशमय झालं. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यानंतर पितृ पक्ष पंधरवड्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर गणेशोत्व काळात हा संकेत मिळल्यात तर ते...

Sep 08, 2024, 11:54 AM IST
1/7

गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर पितृपक्ष पंधरवडा सुरु होणार आहे. या पंधरा दिवसांमध्ये शुभ काम केले जात नाही. त्याशिवाय पितृपक्ष हा पितरांना समर्पित असतो. त्यामुळे घरातील पूर्वजांच्या शांतीसाठी श्राद्ध केलं जातं. अशी मान्यता आहे की, पूर्वज पितृपक्ष काळात पृथ्वीवर येतात. त्यामुळे या दिवसांत श्राद्ध, तर्पण, पिंडदान वगैरे धार्मिक विधी करण्यावर भर दिला जातो. 

2/7

हिंदू पंचांगानुसार, यावर्षी पितृ पक्ष मंगळवार, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या दिवसांमध्ये तिथीनुसार पितरांसाठी विधी केला जातो. पितृदोषापासून मुक्तीसाठी या दिवसांमध्ये उपाय केले जातात. जर तुमच्या घरात गणेशोत्सव काळात किंवा पितृ पक्षापूर्वी काही घटना घडल्यास ते पितृदोषाच लक्षण असू शकतं.   

3/7

पितृदोष हा शास्त्रामध्ये अत्यंत घातक मानला जातो. त्याचे दुष्परिणाम कुटुंबातील अनेक पिढ्यांना होत असतो. पितृदोष असल्यास धनहानीपासून कुठल्याही कामात यश येत नाही. त्या घरावर सतत संकट येत असतात. 

4/7

घरात कोणातरी आकस्मित अपघातात मृत्यू किंवा अचानक घरातील व्यक्ती गंभीर आजारी पडून भरपूर प्रमाणात पैसा खर्च होणे, हे पितृदोषाच लक्षण मानलं जातं.   

5/7

प्रत्येक घरात भांड्याला भांड लागतं. पण काही वाद कोर्टापर्यंत जाणे, किंवा पती पत्नीमधील वाद टोकाला जाणे, हेदेखील पितृदोषाचे लक्षण आहे. वारंवार घरावर संकट येणं.   

6/7

जर तुमच्या घरातील तुळस कोमजली आणि अचानक पिंपळाचं झाड वाढल्यास हे अशुभ लक्षण मानलं जातं. याचा अर्थ पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत असे संकेत त्यातून दिले जाते. यामुळे घरात धन, सुख, समृद्धी आणि तुमच्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो. 

7/7

पितृ पक्ष हा अतिशय महत्त्वाचा असून अशा स्थितीत पितरांची शांती आणि पितृदोषापासून मुक्तीसाठी ब्राह्मणांना अन्नदान आणि पंचबली भोग द्यावा, असं शास्त्र सांगत. त्याशिवाय गरजूंना दान देणंही महत्त्वाच असतं.