Devshayani Ekadashi 2023 : देवशयनी एकादशीला चुकूनही करु नका 'या' 4 गोष्टी, बसेल आर्थिक फटका

Devshayani Ekadashi 2023 : आषाढी एकादशीलाच (ashadha ekadashi 2023) देवशयनी एकादशी असं म्हणतात. यादिवशी भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात अशी आख्यायिका आहे. या दिवशी तुमची ही चूक तुम्हाला संकटात टाकू शकते. 

Jun 27, 2023, 15:09 PM IST

Devshayani Ekadashi 2023 : आषाढी एकादशी (ashadha ekadashi 2023) येत्या गुरुवारी 29 जून 2023 ला साजरी करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीलाच भारतात देवशयनी एकादशी म्हणून ओखळली जाते. 

1/7

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाला येणारी देवशयनी एकादशीचं व्रत विष्णूजींची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. 

2/7

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अशी काही कामं आहेत जी चुकूनही करायला नकोत. अन्यथा वैवाहिक जीवनासोबतच वित्तहानी होते.   

3/7

तुळशीमाता ही विष्णूची लाडकी असल्याने त्यामुळे यादिवशी तुळशीमातेला जल अर्पण करु नये असं म्हणतात. त्याशिवाय तुळशीची डाळ तोडून नका, अन्यथा माता लक्ष्मी नाराज होते.   

4/7

देवशयनी एकादशीला इतरांची निंदा करु नका. असं केल्याने तुम्ही त्या व्यक्तीच्या पापाचे भागीदार होता. 

5/7

देवशयनी एकादशीला तांदुळ खाणे आणि तांदुळ दान करणे अशुभ मानले जाते. असं म्हणतात की, ही चूक केल्यास पुढच्या जन्मी कीटकांच्या योनीत जन्म होतो.   

6/7

या दिवशी महिलांशी अपशब्द बोलू नका. त्याशिवाय या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे असं म्हणतात. 

7/7

देवशयनी एकादशी शरीराबरोबरच मनाचीही शुद्धता महत्त्वाची असते. त्यामुळे या दिवशी मनात वाईट विचार आणू नका आणि कुणालाही वाईट बोलू नका. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)