मॉडेल, मुख्यमंत्री ते सक्षम विरोधी पक्ष नेते, असा आहे देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास

Devendra Fadnavis : विदर्भात एक भाजप आणि एक शिंदे गटाचा उमेदवाचा जिंकून आला आहे. तर महाराष्ट्रात महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे मला सरकारमधून मोकळं करा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्विकारली. 

Jun 05, 2024, 17:58 PM IST
1/7

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ते राजीनाम्या देणार अशी चर्चा होतेय. फडणवीस हे अभ्यासू वृत्ती, कुशल वक्ते आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील राजकारणात तरुण राजकारणी म्हणून एक वेगळा ठसा उमटलाय. 

2/7

संघाचे सदस्य, नगरसेवक, महापौर, आमदार, भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्री असा त्यांचा कमी वयात मोठा राजकीय प्रवास आहे. वडील गंगाधरराव फडणवीस यांच्याकडून लहानपासून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. 

3/7

अवघ्या 22 व्या वर्षी देवेंद्र फडणवीस ते नागपूर महानगरपालिकेवर जिंकून नगरसेवक झाले. त्यानंतर 27 व्या वर्षी ते महापौरपदी विराजमान झाले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षात ते विधानसभेत निवडून गेले. 

4/7

तिथे त्यांनी आपल्या उत्कृष्ट संसदपटूचा मान पटकावला. त्यानंतर दिल्लीतही ते मोदींच्या जवळचे एक नेते बनले. भाजपची सत्ता येताच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. 2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्राला तरुण मुख्यमंत्री मिळाला. त्यावेळी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशा घोषणा देण्यात आल्या. 

5/7

 मुख्यमंत्री काळात त्यांनी जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, शहराला जोडणारे मेट्रो प्रकल्प यावर लक्षकेंद्रीत केलं.  प्रशासनात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी अनेक कायदे आणलेत. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अशा अनेक योजना आणून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. 

6/7

महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत ते विरोधीपक्षाच्या बाकावरही बसले. त्यावेळी त्यामधील विरोधपक्ष नेताची एक वेगळ रुप जनतेला दिसलं. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर त्यांनी सरकारला धारेवर धरलं. कोरोना काळातील गैर व्यवहारावर त्यांनी राज्याच लक्षकेंद्रीत केलं. 

7/7

 तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, राजकारणीसह ते एक मॉडेलही होते. 2006 मध्ये जवळचे मित्र विवेक रानडे यांच्या दुकानासाठी त्यांनी मॉडेलिंग केली होती. या जाहिरातीची दिल्लीत पोहोचली. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना खास दिल्लीला बोलावून घेतलं होतं. तेव्हा त्यांचं कौतुक करताना म्हटलं व्वा व्वा क्या स्मार्ट मॉडेल है ये!