अजित पवारांकडून सूरज चव्हाणला 'बिग बॉस'पेक्षाही महागडं गिफ्ट! स्वत: सूरज म्हणाला, 'त्यांनी गरीबाची...'

Ajit Pawar Big Gift To Suraj Chavan: बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता असलेल्या सूरज चव्हाणला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट नेमकं काय आहे पाहूयात...

Swapnil Ghangale | Oct 21, 2024, 16:13 PM IST
1/11

ajitpawarsurajchavan

अजित पवारांकडून सूरज चव्हाणला 'बिग बॉस'पेक्षाही महागडं गिफ्ट मिळालं आहे. हे गिफ्ट नेमकं काय आहे आणि याबद्दल सूरज काय म्हणालाय पाहूयात...

2/11

ajitpawarsurajchavan

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच भेट घेतली.

3/11

ajitpawarsurajchavan

अजित पवार यांनीच या भेटीदरम्यानचे फोटो शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली.

4/11

ajitpawarsurajchavan

"बिग बॉस मराठी पाचव्या सीझनचा विजेता, आमच्या बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण याने आज माझी सदिच्छा भेट घेतली," असं या फोटोंना कॅप्शन देताना अजित पवारांनी म्हटलं आहे. 

5/11

ajitpawarsurajchavan

यावेळी सूरजच मनापासून अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या, असंही अजित पवार यांनी भेटीचे तीन फोटो शेअर करत म्हटलं आहे.  

6/11

ajitpawarsurajchavan

या भेटीदरम्यान अजित पवार यांनी सूरजला मोठी भेट दिल्याचं त्यानेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

7/11

ajitpawarsurajchavan

गावात तुझं छोटसं खोपटं होतं ते पावसात वाहून जायचं आता तू बीग जिंकला आहेस आता गावाला मोठं घर बांधणार का? असा प्रश्न मुलाखतीत सूरजला विचारण्यात आला. 

8/11

ajitpawarsurajchavan

यावर हसतच सूरजने, "दादांनी दिलंय की! गरिबाची इच्छा पूर्ण केली दादांनी... आता बंगला होईल गावात," असं उत्तर दिलं.   

9/11

ajitpawarsurajchavan

"अजितदादांना भेटला तेव्हा तू सांगितलं की त्यांनी स्वत:हून सांगितलं मी तुझ्यासाठी घर बांधून देतो?" असा पुढला प्रश्न सूरजला विचारण्यात आला.   

10/11

ajitpawarsurajchavan

त्यावर सूरजने, "त्यांनी स्वत: (सांगितलं.) माझ्यासाठी गिफ्ट आहे म्हणाले. दादांनी दिलं मोठं गिफ्ट," असं उत्तर दिलं. या उत्तराचा व्हिडीओ अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी शेअर केला आहे.  

11/11

ajitpawarsurajchavan

बिग बॉस जिंकल्यानिमित्त विजेता म्हणून सूरजला 14 लाख 60 रुपये बक्षिसाची रक्कम यापूर्वीच मिळाली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून देण्यात येणारं हे गिफ्ट बिग बॉसच्या बक्षिसाच्या रक्कमेपेक्षाही अधिक महागडं असेल असं बोललं जात आहे.