'डेक्कन ओडिसी'; नव्या रुपात राजेशाटी थाटाचा रेल्वे प्रवास; तिकीटासाठी लागतोय वर्षभराचा पगार

देशातील काही Luxury Train पाहता याचा एका क्षणात अंदाज येतो. अशाच लक्झरी रेल्वेंपैकी एक असणाऱ्या डेक्कन ओडिसीचं नवं रुप आता प्रवाशांना अनुभवता येणार आहे.  

Sep 22, 2023, 09:08 AM IST

Deccan Odyssey Luxury Train : भारतीय रेल्वेनं प्रवाशांना फक्त देशातील विविध भागांमध्ये प्रवास करण्याची मुभाच दिली नाही, तर या रेल्वे विभागानं प्रवाशांना प्रवासाचा एक अद्वितीय अनुभवही सातत्यानं दिला आहे.

1/9

भारतीय रेल्वे

Deccan Odyssey Luxury Train ticket price journey lartest updates

Deccan Odyssey Luxury Train : भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक काळ गाजवणारी आणि जवळपास मागच्या 4 वर्षांपासून यार्ड़ातच असणारी डेक्कन ओडिसी ही रेल्वे आता कात टाकताना दिसत असून, नव्या रुपात प्रवाशांना प्रवासाचा नवा अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे.  

2/9

23 सप्टेंबरपासून या रेल्वेचा नवा प्रवास

Deccan Odyssey Luxury Train ticket price journey lartest updates

23 सप्टेंबरपासून या रेल्वेचा नवा प्रवास सुरु होणार आहे. नुकताच या रेल्वेचा दुसऱ्या पर्वातील पहिला उदघाटनपर प्रवास पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल असा परतीचा प्रवास या रेल्वेनं केला.  

3/9

महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा रेल्वेप्रवास फायद्याचा

Deccan Odyssey Luxury Train ticket price journey lartest updates

Deccan Odyssey 2.0 असं नाव या रेल्वेचं नाव असून आता ती प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा रेल्वेप्रवास अतिशय फायद्याचा ठरणार आहे.  

4/9

1.64 कोटी रुपयांची भर

Deccan Odyssey Luxury Train ticket price journey lartest updates

एमटीडीसीनं 'इबिक्स'सोबत केलेल्या भागिदारीच्या करारामुळं Deccan Odyssey तून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कमाईत साधारण 1.64 कोटी रुपयांची भर पडणार आहे.  

5/9

चतारांकित हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा

Deccan Odyssey Luxury Train ticket price journey lartest updates

डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा असतील. स्पा, पार्लर, जीम, विविध पदार्थांची रेलचेल असणारं रेस्तराँ या रेल्वेला चार चाँद लावत आहे.  

6/9

प्रवासमार्गांविषयी...

Deccan Odyssey Luxury Train ticket price journey lartest updates

प्रवासमार्गांविषयी सांगावं तर, या रेल्वेचा प्रवास महाराष्ट्र स्प्लेंडर, महाराष्ट्र वाईल्ड ट्रेन, इंडियन सोजन, इंडियन ओडिसी, हेरिटेज ओडिसी, कल्चरल ओडिसी असा विभगाण्यात आला आहे.  

7/9

ठरलेल्या मार्गानुसार रेल्वे प्रवास

Deccan Odyssey Luxury Train ticket price journey lartest updates

यामध्ये मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव; मुंबई, वडोदरा, उदयपूर, जोधपूर, जयपूर, आग्रा, सवाई माधोपूर, नवी दिल्ली; नवी दिल्ली, सवाई माधोपूर, उदयपूर, जोधपूर, जैसलमेर, जयपूर, नवी दिल्ली; मुंबई, छत्रपती संभाजीनगर, रामटेक, पाचोरा, नाशिक रोड, मुंबई अशा ठिकाणांहून ठरलेल्या मार्गानुसार रेल्वे प्रवास करेल.  

8/9

प्रवास भाडं किती?

Deccan Odyssey Luxury Train ticket price journey lartest updates

डेक्कन ओडिसीनं सात दिवस आणि 8 रात्री असा प्रवास करण्यासाठी तुम्हाला साधारण $8330 म्हणजेच 6,89,960.16 रुपये माणसी इतकं भाडं भरावं लागणार आहे.  

9/9

रेल्वे प्रवासाचं हे भाडं पॅकेजनुसार बदलेल

Deccan Odyssey Luxury Train ticket price journey lartest updates

रेल्वे प्रवासाचं हे भाडं पॅकेजनुसार बदलेल याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. हे रेल्वेभाडं म्हणजे अनेकांचा वर्षभराचा पगार आहे. त्यामुळं डेक्कन ओडिसीनं प्रवास करण्यासाठी आतापासून बेत आखा आणि एक आठवण कायमस्वरुपी मानत साठवून ठेवा. (सर्व छायाचित्रे- डेक्कन ओडिसी)