Dasara Wishesh 2023 : दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा, जवळच्या व्यक्तीला द्या 'या' खास शुभेच्छा

Vijayadashami Wishes : मंगळवार 24 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरात 'दसरा' सण साजरा केला जाणार आहे. दसरा, ज्याला विजयादशमी असे देखील म्हटले जाते. महत्त्वाच्या हिंदू सणांपैकी हा एक सण आहे. नऊ दिवस नवरात्री या उत्सवानंतर 'दसरा' हा सण येतो. 

| Oct 23, 2023, 16:09 PM IST

Happy Dussehra 2023: 'दसरा' हा सण साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात 'सोनं' एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापती रावण ज्याचे माता सितेचे अपहरण केले त्याचा वध करुन विजय मिळवला होता. तसेच या दिवशी रावणाचा पुतळा तयार करुन त्याचे दहन केले जाते. या व्यतिरिक्त नवरात्रौत्सवाचा अखेरचा दसऱ्याचा दिवस असल्याने देवीचे विसर्जन दसरा झाल्यानंतर केले जाते. रावणाचा पुतळा दहन करताना प्रत्येकजण वाईट गोष्टी आणि विचारांचा अंत करुन चांगल्या आणि सकारात्मक मार्गावर जाण्याचा संकल्प करतात. 

आता सणवार साजरा करत असताना प्रत्येकजण आपल्या जवळच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचे संदेश पाठवत असतात. विजयादशमी, दसऱ्यानिमित्त द्या मराठी भाषेतून शुभेच्छा...

(फोटो सौजन्य - iStock)

1/7

मराठीतून शुभेच्छा 1

"आपट्याची पानं, झेंडूची फुलं, घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभ दिनी सुख, समृद्धी नांदो तुमच्या जीवनी"

2/7

मराठीतून शुभेच्छा 2

"आला आला दसरा, दुःख आता विसरा चेहरा ठेवा हसरा, साजरा करु दसरा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा"

3/7

मराठीतून शुभेच्छा 3

"झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा"

4/7

मराठीतून शुभेच्छा 4

"उस्तव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा.. नवे जुने विसरुन सारे, फक्त आनंद वाटण्याचा.. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा."

5/7

मराठीतून शुभेच्छा 5

"हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान, सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान."  

6/7

मराठीतून शुभेच्छा 6

"पुन्हा एक नवी पहाट, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा.. नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत नव्या शुभेच्छा."

7/7

मराठीतून शुभेच्छा 7

"आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, तुमच्या जिवनात येवो आनंदाची बहार, दसऱ्या निमित्ते करावा शुभेच्छांचा स्वीकार."