चावला तर हाडांचा चुरा होईल! ब्रिटनमध्ये 'या' श्वानावर बंदी, पाहा किती आहे धोकादायक

American Bully Dogs are Banned In Britain: ब्रिटनच्या बर्मिंगहॅममध्ये एका 11 वर्षांच्या मुलीवर अमेरिकन बुली डॉग जातीच्या कुत्र्याने हल्ला केला. या मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या इतर दोन माणसांनाही त्याने सोडलं नाही. कुत्र्याच्या हल्ल्यात तिघंही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर American Bully Dogs वर बंदी घालण्याच्या मागणीने जोर धरला. यादरम्यानच हा कुत्रा चावल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी आपातकालिन बैठक बोलावत या जातीच्या कुत्र्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. 

राजीव कासले | Sep 16, 2023, 19:21 PM IST
1/7

ब्रिटनमधल्या वॉल्सॉलमध्ये अमेरिकन बुली डॉगच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर बर्मिंगहॅममधल्या बोर्डेस्ले ग्रीन मध्ये एका 11 वर्षांच्या मुलीवर या जातीच्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

2/7

एकाच आठवड्यात झालेल्या दोन घटनांची थेट पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दखल घेतली. आपातकालिन बैठक बोलावत American Bully Dogs जातीच्या कुत्र्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. 

3/7

श्वानप्रेमींनी मात्र या निर्णयावर नाराज व्यक्त केली आहे. हा कुत्रा दिसायला भीतीदायक वाटत असला तरी तो प्रेमळ आणि माणसाळलेला आहे. हा कुत्रा शक्तीशाली असला तरी सौम्य आणि मैत्रीपूर्ण असतो. क्वचितच हा कुत्रा आक्रमक होतो.

4/7

1980 च्या दशकात  हे कुत्रे अमेरिकेत आढळत होते. अमेरिकी पीटबुल टेरियर्स आणि अमेरिकी स्टॅफोर्डशायर टेरियर्सचं क्रास ब्रिडमधून या कुत्र्याचा जन्म झाला. त्याला अमेरिकन बुली डॉग असं नाव देण्यात आलं.

5/7

अमेरिकन बुली डॉगचे चार प्रकार आहेत. यात स्टॅंडर्ड, पॉकेट, क्लासिक आणि एक्सएल. अमेरिकी बुली एक्सएलचं वजन जवळपास 60 किलोहून अधिक असतं. 

6/7

अमेरिकन एक्सएल बुली डॉग प्रेमळ वाटत असले तरी ते आक्रमक झाल्यावर कोणाचंच ऐकत नाहीत. या कुत्र्यांमध्ये इतकी ताकद असते की एखाद्याला चावले तर त्यांच्या हाडांचाही चुरा होईल. 

7/7

ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात आलेला अमेरिकन बुली डॉग हा पावचा कुत्रा आहे. याआधी पिटबुल टेरियर, जापानी टोसा, डोगो अर्जेंटिनो आणि फिला ब्रासीलीरो या कुत्र्यांवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरकिन बुली डॉगवर अनेक देशात बंदी आहे. भारतात मात्र या कुत्र्यावंर बंदी नाही. भारतात या कुत्र्याची किंमत 30 ते 80 हजार रुपये इतकी आहे.