Shardul Thakur: शार्दुल ठाकूरच्या गर्लफ्रेंडने अशा प्रकारे दिल्या हटके वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा काय होती ऑलराउंडरची प्रतिक्रिया

Shardul Thakur Birthday: टीम इंडियाचा  (Team India) अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur ) आज (16 ऑक्टोबर) 31 वर्षांचा झाला आहे. या खासप्रसंगी त्याची होणारी पत्नी मिताली परुलकर (Mittali Parulkar) हिने त्याला खास लव्ह संदेश देऊन बर्थडे विश केला. त्यावर शार्दुल ठाकूरनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

| Oct 16, 2022, 08:45 AM IST
1/5

मिताली परुलकर (Mittali Parulkar) हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शार्दुल ठाकूरसोबतचा (Shardul Thakur) एक फोटो शेअर करुन तिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम्हाला आजच्या सर्वात मोठ्या आनंदाच्या शुभेच्छा.' हा फोटो शेअर करत शार्दुल ठाकूर याने हार्ट इमोजीसह धन्यवाद (Thank You)असे लिहिले. 

2/5

अष्टपैलू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने 29 नोव्हेंबर 2021 रोजी त्याची मैत्रीण मिताली पारुलकर (Mittali Parulkar) हिच्यासोबत साखरपुडा केला. मुंबईत झालेल्या एका सेरेमनीमध्ये दोघांची एंगेजमेंट झाली, ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हाही उपस्थित होता.

3/5

Shardul Thakur - शार्दुल ठाकूर याने गर्लफ्रेंड मिताली परुलकर हिच्याशी साखरपुडा केला आहे. आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप 2022नंतर (T20 World Cup 2022) शार्दुलचे लग्न होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

4/5

Mittali Parulkar - मिताली परुलकर ही एक व्यावसायिक महिला आहे. मिताली ठाण्यात 'ऑल द बेक्स' नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. शार्दुल ठाकूर याने मितालीला बरेच दिवस डेट करत आला आहे.

5/5

Shardul Thakur- शार्दुल ठाकूर याने टीम इंडियासाठी  (Team India) आतापर्यंत 8 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 27 तर एकदिवसीय सामन्यात 39 विकेट्स आहेत. शार्दुलने T20 मध्ये 33 शिकार केल्या आहेत.