T20 World Cup साठी रोहित शर्माचे 15 महारथी, अशी आहे त्यांची टी20 वर्ल्ड कपमधली कामगिरी
T20 World Cup India Squad : टी20 वर्ल्ड कपासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर 4 खेळाडूंना रिझर्व्ह ठेवण्यात आलं आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल या संघात दिसून येतोय. 1 जूनपासुन सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 5 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया टी20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या रोहितच्या पंधरा महारथींची कामगिरी कशी आहे.
1/15
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 2007 मध्ये टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता. रोहित भारतासाठी आतापर्यंत 151 टी20 खेळला आहे. यात त्याने 3974 धावा केल्यात. रोहित शर्माच्या नावावर 5 शतक आणि 29 शतकं जमा आहेत. टी20 क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 139.97 इतका आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहितने 39 सामन्यात 963 धावा केल्यात.
2/15
विराट कोहलची टी20 वर्ल्ड कपमधली कामगिरी दमदार राहिलीय. टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड विराटच्या नावावर आहे. पण यानंतरही त्याला टी20 जिंकण्याची संधी एकदाही मिळालेली नाही. कोहली भारतासाठी आतापर्यंत 117 टी20 सामने खेळलाय, आणि यात त्याने 4037 धावा केल्यात. टी20 वर्ल्ड कपमध्ये विराटने 27 सामन्यात 1141 धावा केल्यात.
3/15
4/15
टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा हुकमी खेळाडू असणार आहे तो टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादव. सूर्याने भारतासाठी 60 टी20 सामन्यात 2141 धावा केल्या आहेत. आणि त्याचा स्ट्राईक रेट 171.55 इतका जबरदस्त आहे. टी20 क्रिकेटेमध्ये सूर्याच्या नावावर 4 शतक आणि 17 अर्धशतकं जमा आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये सूर्या 10 सामने खेळला असून यात त्याने 281 धावा केल्यात.
5/15
भारतीय क्रिकेट संघातील विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतसाठी हा महत्त्वाचा क्षण असणार आहे. कार अपघाता नंतर तब्बल 14 महिन्यांनंतर पंतने टीम इंडियात कमबॅक केलं आहे. आयपीएलमध्ये तो दमदार कामगिरी करतोय. पंत भारतासाठी आतापर्यंत 66 टी20 सामने खेळलाय आणि यात त्याने 987 धावा केल्यात. पंत आतापर्यंत दोन टी20 वर्ल्ड कप खेळला असून यात तो सात सामने खेळलाय. सात सामन्यात त्याने 87 धावा केल्यात.
6/15
टीम इंडियात सर्वात जास्त चर्चा आहे ती संजू सॅमसनची. आयपीएमधल्या दमदार कामगिरीच्या जोरावर सॅमसनने टीम इंडियात जागा पटकावली आहे. सॅमसन टीम इंडियातील दुसरा विकेटकिपर असणार आहे. सॅमसमने केएल राहुल, ईशान किशन आणि दिनेश कार्तिकला मागे टाकत संघात जागा बनवली आहे. सॅमसनने 25 टी20 सामन्यात 374 धावा केल्या. सॅमसनचा ही पहिलीच टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आहे.
7/15
एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये पुन्हा मैदानात उतरला आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय. हार्दिकने भारतासाठी खेळलेल्या 92 टी20 सामन्यात 1348 धावा केल्यात. शिवाय त्याने 73 विकेटही घेतल्यात. टी20 वर्ल्ड कपच्या 16 सामन्यात हार्दिकने 243 धावा आणि 13 विकेट घेतल्यात.
8/15
9/15
10/15
11/15
12/15
13/15
14/15
15/15