अपघातातून मिळाला नवीन जन्म, 6 कोटींचं कार कलेक्शन, ऋषभ पंतची संपत्ती पाहून डोळे फिरतील

टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत हा आज त्याचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतचा भीषण कार अपघात झाला होता. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातातून वाचलेल्या ऋषभ पंतला नवीन जीवन मिळाले होते. तब्बल दीड वर्षांनी पंतने आयपीएल 2024 मधून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. वर्ल्ड कप 2024 मध्ये देखील त्याने दमदार कामगिरी करून टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले. 

| Oct 04, 2024, 07:00 AM IST
1/5

4 ऑक्टोबर 1997 रोजी ऋषभ पंतचा जन्म रुडकी (उत्तराखंड) येथे झाला होता. पंत त्याची आक्रमक फलंदाजी आणि विकेटकिपिंगसाठी ओळखला जातो. कमी वयात त्याने भारतीय संघात अढळ स्थान निर्माण केलं असून तो आयपीएलमध्येही दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. ऋषभ पंतला महागड्या गाड्यांचा शौक असून त्याच्या कलेक्शनमध्ये अनेक महागड्या कार आहेत.   

2/5

किती आहे ऋषभ पंतची नेटवर्थ?

ऋषभ पंतची नेटवर्थ जवळपास 100 कोटी आहे. पंतच्या कमाईचे मुख्य साधन हे आयपीएल, बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट आणि ब्रँड एंडोर्समेंट आहे. आयपीएलमध्ये दिल्लीचा कॅप्टन असलेल्या पंतला एका सीजनसाठी 16 कोटी रुपये मिळतात. तसेच त्याच्याकडे बीसीसीआयचे वार्षिक बी ग्रेड खेळाडूचे कॉन्ट्रॅक्ट असून यातून त्याला वर्षाला 3 कोटी रूपये मिळतात. याशिवाय याला एक टेस्ट खेळण्यासाठी 15 लाख, वनडेमध्ये 6 लाख तर टी 20 क्रिकेटमध्ये 3 लाख रुपये मिळतात. आयपीएलमधून त्याने आतापर्यंत 74 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

3/5

6 कोटींचं कार कलेक्शन :

ऋषभ पंतला आलिशान गाड्यांची फार आवड असून त्याच्याकडे एकूण 6 कोटींचं कार कलेक्शन आहे. पंत यांच्याकडे फोर्ड मसगची कार असून ज्याची किंमत 2 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे 75 लाखांची मर्सिडीज बेंझ असून ज्याची किंमत 75 लाख रुपये आहे. पंतकडे 1.3 कोटी रुपयांची ऑडी ए-8 कार आणि  2 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ जीएलई देखील आहे. डिसेंबर 2022 मध्ये ज्या कारमध्ये पंतचा अपघात झाला ती देखील मर्सिडीज कार होती.

4/5

रुडकीमध्ये पंतचं आलिशान घर :

ऋषभ पंतच रुडकीमध्ये आलिशान घर असून त्याच किंमत जवळपास 60 लाख ते एक कोटी इतकी आहे. या घरात तो आई आणि बहिणीसोबत राहतो. ऋषभ पंतच्या गर्लफ्रेंडचं नाव ईशा नेगी असून ती रिषभ पंतला सामन्याच्यावेळी सपोर्ट करताना दिसते. 

5/5

ऋषभ पंतची कारकीर्द :

वयाच्या 27 व्यावर्षी ऋषभ पंतने टीम इंडियाकडून टेस्ट, वनडे आणि टी 20 अशा तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं आहे. पंतने 35 टेस्ट सामन्यात 2432 धावा तसेच  6 शतक आणि 11 अर्धशतक लगावली आहेत. ऋषभ पंतने 31 वनडे सामने खेळताना 871 धावा 1 शतक आणि 5 अर्धशतक ठोकली. तसेच टी 20 मध्ये त्याने 76 सामन्यात 1209 धावा आणि 3 अर्धशतक केली आहेत. आयपीएलमध्ये ऋषभने 111 सामने खेळताना 3284 धावा केल्या आहेत. यात त्याने 1 शतक आणि 18 अर्धशतक केली.