कुंडली जुळेलही! पण लग्नाआधी संभाव्य जोडप्यांनी करा 'या' 6 मेडिकल टेस्ट

Medical Tests Before Marriage: लग्नाआधी मेडिकल टेस्ट केल्यास अनेक रोग आणि परिस्थिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्यापासून रोखता येते.

| Nov 27, 2023, 14:47 PM IST

Medical Tests Before Marriage: लग्नाआधी मेडिकल टेस्ट केल्यास संभाव्य वधू-वरांच्या आरोग्याची स्थिती समजून घेता येते. संसर्गजन्य रोग आधीच ओळखता येतात.

1/8

कुंडली जुळेलही! पण लग्नाआधी संभाव्य जोडप्यांनी करा 'या' 6 मेडिकल टेस्ट

Couples should undergo medical tests Before marriage Relationship Health Marathi News

Medical Tests Before Marriage:लग्न करण्याआधी मुल-मुली कुंडली पाहतात. एकमेकांचे स्वभाव जुळतात का ते पाहतात. पण यासोबतच एकमेकांची आरोग्यस्थिती माहिती असणे आवश्यक आहे. लग्नाआधी जोडप्याने आरोग्य चाचणी करण्याचे खूप फायदे आहेत.

2/8

आरोग्य सेवा केंद्रात तपासणी

Couples should undergo medical tests Before marriage Relationship Health Marathi News

असे केल्यास संभाव्य वधू-वरांच्या आरोग्याची स्थिती समजून घेता येते. संसर्गजन्य रोग आधीच ओळखता येतात. प्रजनन आणि अनुवांशिक रोगांचा धोकाही कमी होतो. विवाहपूर्व काऊन्सेलिंगसाठी जाण्यापूर्वी, जोडप्याला अनेकदा आरोग्य सेवा केंद्रात शारीरिक तपासणीसाठी जाण्याचा सल्ला दिला जातो.

3/8

अनुवांशिक

Couples should undergo medical tests Before marriage Relationship Health Marathi News

हिपॅटायटीस बी संसर्ग, एचआयव्ही, हिपॅटायटीस सी आणि इतर लैंगिक संक्रमित रोगांसारखे संसर्गजन्य रोग शोधणे शक्य होते. अनुवांशिक रोगांचे वाहक ओळखता येतात. 

4/8

विवाहपूर्व समुपदेशन

Couples should undergo medical tests Before marriage Relationship Health Marathi News

या सर्व चाचण्या जेव्हा जोडप्याने केल्या, तेव्हा त्यांना थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल रोग अशा कोणत्याही गंभीर आजाराने मूल होण्याचा धोका आहे की नाही हे समजू शकते. विवाहपूर्व समुपदेशनादरम्यान करायच्या चाचण्यांबद्दल जाणून घेऊया. 

5/8

सामान्य चाचणी

Couples should undergo medical tests Before marriage Relationship Health Marathi News

या चाचणीत संपूर्ण कम्प्लीट ब्‍लड काउंट (सीबीसी), कम्प्लीट यूरिन अॅनालिसिस आणि पेरिफेरल ब्‍लड स्‍मीयर्स यांचा समावेश होतो. याद्वारे सामान्य आणि असामान्य पेशींची तपासणी केली जाते. आरएच-निगेटिव्ह महिलांचा शोध घेण्यासाठी आणि गर्भधारणेच्या जोखमींबद्दल त्यांना सल्ला देण्यासाठी रक्तगट चाचणी (ABO-Rh) आवश्यक आहे.

6/8

संसर्गजन्य रोग चाचणी

Couples should undergo medical tests Before marriage Relationship Health Marathi News

ही चाचणी HIV, हिपॅटायटीस B आणि C आणि STD सारख्या विविध रोगांसाठी जोडप्यांची चाचणी करते. कारण उपचार न केल्यास त्यांचे वंध्यत्व, गर्भाची नासाडी, एक्टोपिक गर्भधारणा, कर्करोग आणि मृत्यू यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.

7/8

अनुवांशिक चाचणी

Couples should undergo medical tests Before marriage Relationship Health Marathi News

कौटुंबिक इतिहास आणि वंशावळीवर आधारित जोडप्यांसाठी विविध चाचण्या केल्या जातात. मुलामुलीची वंशावळी,नातेसंबंध तपासण्यासाठी केल्या जातात. त्यानुसार रक्त चाचणीचा सल्ला दिला जातो. कारण अशा विवाहांमुळे जन्मलेल्या मुलांना वडिलोपार्जित आजार होण्याची शक्यता असते. नाते जितके जवळ असेल तितका धोका जास्त. रक्त किंवा शरीराच्या ऊतींचे लहान नमुने अनुवांशिक चाचण्यांसाठी विश्लेषित केले जातात.

8/8

विवाहपूर्व तपासणी

Couples should undergo medical tests Before marriage Relationship Health Marathi News

तुम्ही तुमची प्रजनन चाचणी, कायमचा आजार आणि मानसिक आरोग्य तपासले पाहिजे. जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल तर प्रत्येक जोडप्याने विवाहपूर्व तपासणी केली पाहिजे, कारण यामुळे अनेक रोग आणि परिस्थिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्यापासून रोखता येते.