Countdown Start... काही तासांतच चंद्रयान - 3 अंतराळात झेप घेणार ! 140 कोटी भारतीयांचं स्वप्न साकारणार
काही तासात चंद्र भारताचा होणार आहे. 14 जुलैला जेव्हा घडाळ्यात 2 वाजून 35 मिनिटं झालेली असतील तेव्हा भारत अंतराळात एक नवीन इतिहास रचेल. चंद्रयान - 3 अंतराळात झेप घेणार आहे.
Chandrayaan-3 : 14 जुलै रोजी भारत एक मोठी ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटात इतिहास रचला जाईल. याच दिवशी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून चंद्रयान-3 ला अंतराळात झेपवणार आहे. लाँचिंगची तयारी पूर्ण झाली आहे.तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची रंगीत तालीमही पूर्ण झालीय आणि रंगीत तालीम 100 टक्के यशस्वी ठरली आहे.
1/7
4/7