मुंबईत पहिली कोरोना टेस्ट बस, कमी खर्चात होणार कोरोना टेस्ट

May 13, 2020, 16:14 PM IST
1/5

कोरोना व्हायरसचा प्रार्थना रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाकडून अनेक प्रयत्न होत आहेत. त्यातच आता मुंबईत बीएमसी आणि आयआयटी एलुमनाई काउंसिलकडून कोरोना टेस्टसाठी एक स्पेशल बस लॉन्च करण्यात आली आहे. जी लोकांपर्यंत पोहोचून त्यांची टेस्ट करणार आहे.

2/5

खास गोष्ट म्हणजे कोरोना टेस्टच्या खर्चापेक्षा ही कमी खर्चात येथे टेस्ट होईल. आयआयटी एलुमनाई काउंसिलचं म्हणणं आहे की, खर्च अजून कमी केला जावू शकतो.

3/5

बीएमसीची सेवा देणारी ही पहिली बस आहे. ही बस जास्त लोकसंख्या असलेल्या भागात जावून लोकांचे टेस्ट करेल.

4/5

कोरोना टेस्ट करणाऱ्या या बसमध्ये आरटी-पीसीआर स्वाब कलेक्शन फॅसिलिटी देखील आहे. सरकारने कोरोना टेस्टसाठी RT-PCR टेस्टचा उपयोग करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

5/5

पावसात देखील ही बस लोकांची टेस्ट करु शकेल. याची लॅब स्पेस 384 वर्गफूट आहे.