Smriti Mandhana: विराटशी तुलना योग्य नाही...; स्मृती मंधाना असं का म्हणाली?

Smriti Mandhana: नुकतंच रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या महिला टीमने वुमेंस प्रिमीयर लीगचं जेतेपद जिंकलं. पुरुष टीम जे काम करू शकली नाही ते महिला टीमने करून दाखवल्याने विराट कोहली आणि स्मृती मंधानाची तुलना होऊ लागली आहे. 

Surabhi Jagdish | Mar 19, 2024, 20:09 PM IST
1/7

विराट आणि स्मृतीची तुलना झाल्यानंतर असं होणं योग्य नसल्याचं स्मृतीने म्हटलंय.

2/7

स्मृती मानधना म्हणाली, “ट्रॉफी आपल्या जागी आहे पण 18 नंबरने भारतासाठी खूप काही साध्य केलंय आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. 

3/7

आमच्यात तुलना करणे योग्य ठरेल असं मला वाटत नसल्याचं, मंधानाचं मत आहे.

4/7

माझं करिअर सध्या ज्या ठिकाणी आहे ते विराट कोहलीने आधीच साध्य केलंय आहे. त्याने जे काही मिळवलं आहे त्यामुळे मला तुलना आवडत नाही, असं तिचं म्हणणं आहे. 

5/7

विराट अनेक तरुणांसाठी ते प्रेरणास्थान आहे. 

6/7

आम्ही सर्वच विराटचा आदर करतो आणि भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्याबद्दल असाच आदर असायला हवा असं स्मृतीला वाटतं.

7/7

स्मृती पुढे म्हणते की, माझ्यासाठी काहीही वेगळं नाहीये. जर्सी नंबर ही प्रत्येकाची पर्सनल चॉईल असते.