क्लिक ऑफ द डे : महाराष्ट्रातल्या आमदारांचा शपथविधी सोहळा

आज विधानभवनात महाराष्ट्रातील २८८ नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी एखाद्या 'यजमाना'प्रमाणे सर्वांचं स्वागत केलं.

Nov 27, 2019, 17:31 PM IST

मुंबई : २७ नोव्हेंबरला विधानभवन परिसरात खूप वेगळं चित्र दिसत होतं. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी, पुन्हा पुन्हा पाहवीशी वाटणारी ही काही दृश्य..

 

1/8

सुप्रीया सुळेंची अजित दादाला मिठी

सुप्रीया सुळेंची अजित दादाला मिठी

२७ नोव्हेंबरचा 'क्लिक ऑफ द डे' ठरली सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची मिठी, या मिठीची चर्चा तर होणारच... ही गळाभेट घेण्यासाठी कुणी पुढाकार घेतला? ही गळाभेट मनापासून होती का? पण काही का असेना भावा बहिणीनं मिठी क्लिक ऑफ द डे ठरली 

2/8

रोहीत पवार सुप्रीया आत्याची गळाभेट घेताना

रोहीत पवार सुप्रीया आत्याची गळाभेट घेताना

रोहित पवार, पवार घराण्यातलं आणखी एक व्यक्तीमत्व पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलं आणि त्यांचं कौतुकही झालं... कौतुक केलं ते सुप्रिया आत्यानं... रोहित विधानभवनात येताच आत्याचा पाया पडला 

3/8

सुप्रीया सुळेंकडून आदित्य, रोहीतचं कौतुक

सुप्रीया सुळेंकडून आदित्य, रोहीतचं कौतुक

आदित्य ठाकरे विधानभवनात आले तर स्वागताला सुप्रिया ताई होत्याच. आदित्यला छान मिठी मारून त्याच्या गालावरही हात फिरवला  

4/8

सुप्रीया सुळे आणि देवेंद्र फडणवीस

सुप्रीया सुळे आणि देवेंद्र फडणवीस

जणू घरचा एखादा लग्न सोहळा असावा अशा सुप्रियाताईंची लगबग दिसली. सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचं आगत-स्वागत त्या स्वत: करत होत्या... आवडते नावडते असं काही नाही... कुणाशी शेकहँड तर कुणाशी गळाभेट  

5/8

सुप्रीया सुळे आणि धनंजय मुंडे

सुप्रीया सुळे आणि धनंजय मुंडे

शनिवारी धनंजय मुंडे अजित पवारांसोबत दिसले तेव्हा दु:खी झालेल्या सुप्रियांनी आज धनंजय मुंडेनाही मिठी मारली... ही दृश्य खूप काही सांगून गेली 

6/8

रोहीत पवार आणि आदित्य ठाकरे

रोहीत पवार आणि आदित्य ठाकरे

रोहीत पवार आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेत 

7/8

आदित्य ठाकरे सिद्धीविनायक मंदिरात

आदित्य ठाकरे सिद्धीविनायक मंदिरात

आयुष्यातला नवा अध्याय सुरु करताना दैवताची आठवण प्रत्येकालाच येते. त्याला आदित्य ठाकरेही अपवाद नाहीत. मातोश्रीवरून बाहेर पडताच त्यांनी गाठलं सिद्धिविनायक मंदिर... 

8/8

उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

संपूर्ण महिना राज्यात गाजवला तो ठाकरे आणि पवारांनी... २७ नोव्हेंबरला विधानभवन परिसरात हे सगळे दिसले. उद्धव यांनी मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत भावी मिसेस मुख्यमंत्र्यांचीही विशेष उपस्थिती जाणवली