CJI DY Chandrachud: भारताचे 50 वे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड कोण आहेत?

50th CJI DY Chandrachud : न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणजेच धनंजय चंद्रचूड यांनी देशाचे 50 वे सरन्यायाधीश (Justice Chandrachud Oath) म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार मूलभूत अधिकार असल्याचं म्हणत जुना कायदा रद्द करत ऐतिहासिक निर्णय घेतला होता.   

Nov 09, 2022, 17:09 PM IST

50th CJI DY Chandrachud : न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणजेच धनंजय चंद्रचूड यांनी देशाचे 50 वे सरन्यायाधीश (Justice Chandrachud Oath) म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार मूलभूत अधिकार असल्याचं म्हणत जुना कायदा रद्द करत ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठात एक न्यायाधीश होते ते म्हणजे डी. वाय.चंद्रचूड...देशाचे माजी सरन्यायाधीश उदय लळित यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर आणखी एक मराठी व्यक्ती विराजमान झाला आहे. यानिमित्ताने त्यांचाबद्दल काही जाणून घेऊयात. (Dhananjay Chandrachud inforrmation in marathi nmp)

1/5

CJI DY Chandrachud - Dhananjay Chandrachud inforrmation in marathi nmp

50th CJI DY Chandrachud:  देशाचे 50 वे सरन्यायाधीश यांच्या जन्म पुण्यात (Pnue) झाला.  धनंजय चंद्रचूड यांचं मुळ गाव पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या कनेरसरमधलं..त्यामुळे कनेरसर गाव पुन्हा एकदा देश पातळीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. तर त्यांचं शालेय शिक्षण हे मुंबईतील कॅथड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमध्ये झालं. कायद्याची पदवी त्यांनी दिल्ली विद्यापीठातून घेतली.

2/5

CJI DY Chandrachud - Dhananjay Chandrachud inforrmation in marathi nmp

13 मे 2016 पासून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. 

3/5

CJI DY Chandrachud - Dhananjay Chandrachud inforrmation in marathi nmp

Unmarried Women Have Right To Abortion: अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ज्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने घेतला त्यातील एक नाव म्हणजे धनंजय चंद्रचूड ( CJI DY Chandrachud )

4/5

CJI DY Chandrachud - Dhananjay Chandrachud inforrmation in marathi nmp

31 ऑक्टोबर 2013 ते 13 मे 2016 अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यापूर्वी 29 मार्च 2000 ते 31 ऑक्टोबर 2013 मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

5/5

CJI DY Chandrachud Dhananjay Chandrachud inforrmation in marathi nmp

Justice Dy Chandrachud: दोन प्रौढ व्यक्तींनी परस्पर समलैंगिक संबंध ठेवले असतील तर त्याला गुन्हा मानता येणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय त्यांनी दिला होता.