Children's Day Wishes in Marathi: 'बालपण देगा देवा'; बालदिनानिमित्त द्या खास शुभेच्छा!

Children's Day Wishes 2024 in Marathi: भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी 'बालदिन' साजरे केले जाते. या दिनानिमित्त आपल्या जवळच्यांना पाठवा खास बालदिनाचे मराठमोळे संदेश. 

| Nov 13, 2024, 17:03 PM IST

दरवर्षी भारतात 14 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करत आहे. 1959 पासून दरवर्षी हा दिवस 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलानल नेहरू यांना लहान मुलांबद्दल खूप प्रेम होते आणि ते त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणत असतं. 1964 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर संसदेत एक ठराव मंजूर करण्यात आला आणि त्यांचा जन्मदिवस भारतात 'बालदिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बालदिनाच्या निमित्ताने मुलांना आणि जवळच्या नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा. 

1/10

थोडा टेंशनला ब्रेक देऊया, रोजचं काम थोडं दूर ठेवूया, तर्कबुद्धीला आराम देऊया, आज थोडं लहान होऊया, Happy Children’s Day

2/10

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण, बालपणीच्या आठवणीत हरवते मन, कधीच येणार नाहीत ते निरागस क्षण, बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

3/10

हा दिवस तुमच्या छोट्या मित्रांसोबत घालवा. त्यांच्या जीवनात आनंद आणण्याचे वचन द्या. बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

4/10

मुलं म्हणजे पाखरांची चपळता, मुलं म्हणजे पाटेची सौम्य उज्ज्वलता मुलं म्हणजे झऱ्याचा खळखळाट, मुलं म्हणजे आनंद उत्साहाचा स्त्रोत, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5/10

जगातील सर्वात चांगला वेळ, जगातील सर्वात चांगला दिवस, जगातील सर्वात सुंदर क्षण, फक्त बालपणीच मिळतात. सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6/10

कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन निरागस, वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो, बालपणचे ते दिवस खरंच सुंदर होते, बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

7/10

खऱ्याखुऱ्या लहानग्यांसोबतच, तुम्हा आम्हामध्ये दडलेल्या छोट्या बाळाला देखील बालदिनाच्या शुभेच्छा!

8/10

चला आज थोडं निरागस होऊया बालदिनाचा आनंदा साजरा करूया, बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

9/10

वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

10/10

मनात बालपण जपणाऱ्या प्रत्येकाला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !